गुन्हेगारी
Trending

केडगाव येथे गोळीबार तसेच संगमनेर पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

(संतोष औताडे – मुख्य संपादक)   दिनांक- 05/03/2023


  क्रमांक/ पीआरओ/प्रेसनोट / ४३/२०२३,

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक २३/०२/२०२३ रोजी फिर्यादी श्री. अरुण नाथा शिंदे, वय ४५, रा. नेप्ती, ता. नगर हे त्यांचे मित्रासोबत हॉटेल के ९ समोर, दारुपित बसलेले असतांना अनोळखी तीन इसम हातात चाकु व पिस्टल घेवुन आले व फिर्यादीचे गळ्याला चाकु लावुन तुमच्या जवळील पैसे काढुन द्या असे म्हणताच फिर्यादी व त्यांचा मित्र पळु लागताच एकाने हातातील पिस्टलने फिर्यादीचा मित्र नामे शिवाजी किसन ऊर्फ देवा होले याचेवर गोळीबार करुन त्याचा खुन केला व फिर्यादीचे डोळ्यात मिरचीपुड टाकुन त्यांचे जवळील रोख व मोबाईल फोन असा एकुण ६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८६/ २०२३ भादविक ३९७, ३०२, ३४ सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना दिनांक २६/०२/२०२३ रोजी घारगांव शिवारात रात्रीचे वेळी अनोळखी तीन इसमांनी पुणे ते नाशिक जाणारे रोड लगत असलेल्या लक्ष्मी टायर पंक्चर दुकानात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन दुकानातील इसमा जवळील व दुकाना समोरील ३४,५००/- रुपये किंमतीची मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली होती. तसेच पुढे जावुन त्याच तीन जणांचे टोळीने साकुर ते मांडवे जाणारे रोडवर, भगवान पेट्रोलपंप, साकुर, ता. संगमनेर येथे पंपावर काम करणारे कर्मचा-यांना चाकु व गावठी कट्टयाचा धाक दाखवुन पंपावरील २,५०,७४७/- रुपये रोख असा एकुण २,८५,२४७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. सदर दोन्ही घटने बाबत घारगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३ / २०२३ भादविक ३९२, ३९४ सह आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील प्रमाणे घटना घडल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणी भेट देवुन अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ / मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकुमार सोनटक्के, दिपक शिंदे, पोकों/सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, लक्ष्मण खोकले मपोना / भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व चापोना / भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकांची नेमणुक करुन तपासकामी तात्काळ रवाना केले.
विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यावरुन गुन्ह्याचे तपासास सुरुवात केली. तसेच अहमदनगर शहर व नगर तालुका परिसर तसेच बायपास व इतर रोडवरील हॉटेल, लॉज, ढाबे व पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती घेत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केडगांव बायपास रोडवरील खुनाचा गुन्हा, साकुर ता. संगमनेर येथील भगवान पेट्रोलपंप जबरी चोरीचा गुन्हा व घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर दुकानातील जबरी चोरीचा गुन्हा हा आरोपी नामे अजय चव्हाण, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर माहितीपथकास कळवून खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पथक तात्काळ वळणपिंप्री, ता. राहुरी येथे जावुन संशयीताचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन त्याचे राहते घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असताना संशयीत आरोपी नामे अजय चव्हाण हा घरात असल्याची खात्री होताच पथकाने त्याचेवर झडप घालून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे

नाव १) अजय भाऊसाहेब चव्हाण, वय २५, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने त्यांचे इतर दोन साथीदारांसह केडगांव बायपास, अहमदनगर येथे गावठी कट्टयातून गोळीबार करुन गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच घारगांव शिवारातील लक्ष्मी टायर पंक्चर दुकान व भगवान पेट्रोल पंप साकुर, ता. संगमनेर येथे पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना चाकू व गावठी कट्टयाचा धाक दाखवुन जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याने पुढील तपास करुन त्याचे इतर दोन साथीदारांचा शोध घेवुन त्यांना त्यांचे राहते घरातून ताब्यात घेतले व त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे २) सागर वसंत जाधव वय २६, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी व ३) राजेंद्र भाऊसाहेब शिंदे वय २७, रा. खेडले परमानंद, ता. नेवासा अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे अजय भाऊसाहेब चव्हाण यांचे सोबत वरील गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

वरील नमुद ताब्यातील तीनही आरोपीतांना पुढील कायदेशिर कारवाईकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
यापूर्वी आरोपी नामे अजय भाऊसाहेब चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर, पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे असे एकुण ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
आहे तो खालील प्रमाणे
हिंजवडी, जिल्हा पुणे कामशेत, जिल्हा पुणे ३२४/२०१६ भादविक ३८२, ४११, ३४
८८/२०१६ भादविक ३७९, ३४
देहुरोड, जिल्हा पुणे निगडी, जिल्हा पुणे१७४/२०१६ भादविक ३७९, ३४ ४६८/२०१६ भादविक ३७९, ३४सोनई, जिल्हा अहमदनगर लोणीकंद, जिल्हा पुणे ८७/२०१६ भादविक ३९४, ३९७, ४११, २०१, ४२७ ४८७/२०१६ भादविक ३९४, ३४
श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर गंगापुर, जिल्हा औरंगाबाद
५५९/२०१६ भादविक ३९२, ५०४, ५०६, ३४ ३०३ / २०१६ भादविक ३९४, ३४
निगडी, जिल्हा पुणे शिक्रापुर, जिल्हा पुणे५२१/२०१७ भादविक ३७९, ३४ ५४१/२०१७ भादविक ३७९, ३४राहुरी, जिल्हा अहमदनगर २१३/२०१७ भादविक ३५३, ३३२, ४२७, ५०६, ३४ यापुर्वी आरोपी नामे सागर वसंत जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात गंभीर दुखापत व दंगा करणे असे एकुण – ०२ गुन्हे दाखल आहे तो खालील प्रमाणे-

राहुरी, जिल्हा अहमदनगर
राहुरी, जिल्हा अहमदनगर
राहुरी ९०४/२१ भादविक १४३, १४७, १४८, ३२३, ३३७, ५०४ राहुरी ९०७/२१ भादविक ३२४, १४३, १४७, १४९, ४२७, ५०४
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, विपोअ, नगर शहर विभाग, मा. श्री. संजय सातव साहेब, उविपोअ, शिर्डी विभाग अतिरिक्त प्रभार संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे