गुन्हेगारी
Trending

नेवासा येथुन जरनेटर चोरी करुन भंगारात विक्री करणारे चार (04) आरोपी 2,20,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरंबद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ची कारवाई.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा) क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/8/2023 दिनांक :- 08/01/2023
————————————————–

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/01/2023 रोजी फिर्यादी श्री. औरंगजेब रबाजी शेख, वय 28, धंदा जनरेटर दुकान, रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खु, ता. नेवासा यांचे जनरेटरचे दुकानातुन अनोळखी आरोपींनी पारस कंपनीचे डिझेल इंजिन असलेले हिरव्या रंगाचे 20,000/- रुपये किंमतीचे दोन (02) जनरेटर चोरुन नेले होते. सदर घटने बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 18/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, पोकॉ/रणजीत जाधव, मच्छिंद्र बर्डे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेवुन नमुद ना उघड गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक नेवासा परिसरात पेट्रोलिंग करुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही इसम चोरी केलेले जनरेटर दत्तनगर रोड, श्रीरामपूर येथील सुतगिरणी जवळील बबलु शहा याचे स्क्रॅप सेंटर (भंगाराचे दुकानात) विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. अनिल कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश देवुन लागलीच रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंच व इतर साधने सोबत घेवुन तात्काळ बेलापुर मार्गे, श्रीरामपूर ते दत्तनगर रोडने जावुन सुतगिरणी, रेल्वे फाटका जवळ सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे काळे रंगाची ताडपत्री असलेला एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो न्यु मदार स्क्रॅप सेंटरमध्ये जाताना दिसला पथकातील अंमलदार यांनी दुकानाचे आडोशाला थांबुन खात्री करता चार-पाच इसम टेम्पोमधील जनरेटर खाली उतरवुन ठेवताना दिसले. त्यांचेवर अचानक छापा टाकुन ताब्यात घेत असताना टेम्पो जवळ उभा असलेला एक इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच रेल्वे पटरीचे कडेने पळु लागला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही.
ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) नाजीम अन्वर पठाण, वय 22, 2) आकाश चंपालाल गायकवाड, वय 20, 3) भारत गोकुळ गांगुर्डे, वय 19 व 4) आदित्य मनोज भवार, वय 20 सर्व रा. वॉर्ड नं.2, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह नेवासा येथील जनरेटर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींना 2,00,000/- रुपये किंमतीचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व 20,000/- रुपये किंमतीचे दोन जनरेटर असा एकुण 2,20,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींना अधिक विश्वासात घेवुन त्यांचेकडे अहमदनगर जिल्ह्यात कोठे कोठे व किती ठिकाणी चोरी केली या बाबत विचारपुस करता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपूर शहर गु.र.नं. 19/2023 भादविक 379
2. राहुरी गु.र.नं. 22/2023 भादविक 379
3. आश्वी गु.र.नं. 1/2023 भादविक 379
4. नेवासा गु.र.नं. 18/2023 भादविक 379
आरोपींनी कबुली दिलेल्या अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करुन खात्री केली असता एकुण चार (04) गुन्हे उघडकिस आल्यने सर्व आरोपींना नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे