गुन्हेगारी
Trending

तीसगाव -पाथर्डी रोडवर कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा)
पीआरओ/प्रेसनोट/६/२०२३          दिनांक :- ०७ /०१ /२०२३

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. दशरथ राघोजी दळवे, वय ३४, रा. शिक्षक कॉलनी, शेवगांव रोड, ता. पाथर्डी हे दिनांक ०९/११/२०२२ रोजी त्यांची पत्नी मोटार सायकलवर रस्त्याने जात असतांना अनोळखी तीन इसम तोंडाला मास्क लावुन काळे रंगाचे पल्सर व हिरोहोंडा डिलक्स मोटार सायकलवर पाठीमागुन येवुन फिर्यादीची मोटार सायकल आडवुन फिर्यादी व त्यांचे पत्नीस कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादीचे पत्नीचे गळ्यातील मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ४१०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन घेवुन गेले आहे. सदर घटने बाबत फिर्यादी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. १०७० / २०२२ भादविक ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पोनि / श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / दिनकर मुंडे, पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळंके, संतोष लोढे, भिमराज खर्से, ज्ञानेश्वर शिंदे, पोका / सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अकाश काळे, कमलेश पाथरुट योगेश सातपुते, विनोद मासाळकर, जालिंदर माने चापोहेकॉ / बबन बेरड, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेवुन नमुद ना उघड गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक पाथर्डी परिसरात पेट्रोलिंग करुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतांना पोनि / श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील आरोपी हे त्यांचे नातेवाईकांना भेटण्यासाठी खरवंडी ते पाथर्डी रोडवरील फाकळी फाटा येथे येणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार है तात्काळ खरवंडी ते पाथर्डी रोडने टाकळी फाटा येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना थोडाच वेळात बातमीतील नमुद वर्णना प्रमाणे तीन संशयीत इसम मोटार सायकलवर येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता ते पाथर्डीच्या दिशेने पळुन जावु लागले. मोटार सायकलवर
संशयीत इसमांना पथकाने आडवले. मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले. त्याचवेळी मोटार सायकलवर चालक मोटार सायकल घेवुन पळुन गेला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सचिन विजय काळे वय २४, रा. शेवगांव व २) सचिन शिरसाठ भोसले वय २५, रा. पिंपळवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदर गुन्हा साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

अ.क्र.आरोपी नामे सचिन विजय काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-

पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

१.वाळुंज, जिल्हा औरंगाबाद

२००/२०१९ भादविक ३९४,३४ २. वाळुंज, जिल्हा औरंगाबाद २१४/२०१९ भादविक ३९२, २०१,३४

वाळंज, जिल्हा औरंगाबाद वाळुंज, जिल्हा औरंगाबाद २९६ / २०१९ भादविक ३९४,३४

२९३/२०१९ भादविक ३९५

वाळंज, जिल्हा औरंगाबाद

२९७/२०१९ भादविक ३७९, ३४ ६. वाळुंज, जिल्हा औरंगाबाद ३००/२०१९ भादविक ३७९,३४

वाळुंज, जिल्हा औरंगाबाद वाळुंज, जिल्हा औरंगाबाद २३४ / २०१९ भादविक ३९२, २०१,३४

२६९/२०१९ भादविक ३९५

९. वाळुंज, जिल्हा औरंगाबाद

२९५/२०१९ भादविक ३७९,३४

१०. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर १०७०/२०२२ भादविक ३९२, ३४

अ.क्र-.आरोपी नामे सचिन शिरसाठ भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-

पोलीस स्टेशन-औरंगाबाद

१८०/२०१५ भादविक ३५४(ब), ५०४, ५०६

२. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद ४८९/२०१६ भादविक ३६६७अ), ३७६ (२) (१), २०१ सह पोक्सो अॅक्ट ५ (एन), ६

३.एमआयडीसी

३५१/२०१७ भादविक ३९९, ४०२

तोफखाना ०३/२०१८ भादविक ४५७,३८०

तोफखाना

१५/२०१८ भादविक ४५७,३८०

३६१ / २०१९ भादविक ४५७, ३८०, ३४ १०६४/२०२० भादविक ३०७, १४३, १४७, १४९

शेवगाव-४०/२०२० भादविक ३०२, ३०७, १४३, १४७, १४९

शेवगाव३५९ / २०२१ भादविक ३९५,३९४,३९७,३४

शेवगाव ३८०/२०२१ भादविक ३९९,४०२

शेवगाव-३५६ / २०२१ भादविक ४५७,३८०

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे