गावाच्या विकासासाठी शासनाचा निर्णय ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक.

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा) दिनांक-10/01/2023
सविस्तर माहिती- ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे घटक आहेत . या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोजच कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी ग्रामविकास विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे . याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवले आहे . जिल्हा परिषदे कडून तत्काळ कार्यवाही करून घेण्यात यावी , केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा आशा सूचना या पत्रात दिल्या आहेत . यामुळे गावातील नागरिकांच्या समस्या आता वेगाने सुटणार आहेत . ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणारी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून गावचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल , तर या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी महत्त्वाची आहे. ज्या शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा उपयोग केला तर कार्यालयात कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश आले आहे . मात्र , ज्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी नाही , अशा कार्यालयात कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. ग्रामसेवक , तलाठी , कृषी सहायक कार्यालयीन वेळेत कधीच उपस्थित राहत नाही अशा तक्रारी आल्या आहेत. या मुळे या कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. या बाबतचे पञ सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांना पाठवण्यात आले आहे. गैरहजर असलेल्या कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे या पञात म्हटलं आहे.औ