नेवासा तालुक्यात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला आरोपींना लवकच जेरबंद करणार- धनंजय जाधव पोलिस निरीक्षक

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -18 जुलै 2025
सविस्तर माहिती- गुरुवारी 17 जुलै रोजी स्वामी विवेकानंद नगर स्थित कांताबाई उसालाल चोरडिया या सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद नगर येथील आपल्या दुकानात असताना गिऱ्हाईक बनून आलेल्या एका तरुणाने आगोदर कोल्ड्रिंक्स बॉटलची मागणी केली. नंतर आईस्क्रीमचा बहाना करून कांताबाई यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चैन डिस्कवरी. सदर अनोळखी चोराचा दुसरा साथीदार शाईन मोटर सायकलवर तयारच होता. चैन हिसवल्यानंतर मोटर सायकलवर दोघेही पसार झाले. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. कांताबाई चोरडिया यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तातडीने तपासणी करून अनोळखी चोर ज्या दिशेने पळून गेले त्या दिशेकडील सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी युद्ध पातळीवर सुरू केलेली आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे कांताबाई चोरडिया यांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. या अनुषंगाने नेवासा पोलीस ठाणे येथे जबरीची चोरी या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
चैन स्नॅचिंगची घटना घडल्या नंतर नेवासा पोलीस ठाण्याच्या आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात तातडीने संदेश देण्यात येऊन नाकाबंदी सुरू करण्यात आली होती परंतु चोर पसार होण्यात यशस्वी झाले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेवासा पोलीस चोरट्यांच्या जवळ पोहोचलेले आहेत, साखळी चोरांची ओळख पटलेली आहे व सदरचा गुन्हा निश्चितपणे उघडकीस आणून अडीच तोळ्याची सोन्याची साखळी परत माघारी मिळवू असा विश्वास नेवासा पोलिसांनी दिलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.
नागरिकांनी किमती व मौल्यवान दागिने शक्यतोवर परिधान करू नयेत केलेच तर त्याची काळजी घ्यावी घ्यावी असे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे.