गुन्हेगारी
Trending

अहमदनगर जिल्ह्यांत दरोडा , जबरी चोरी मोक्का गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. ९ , १२,००० / – ( नऊ लाख बारा हजार रु . किं चे १७२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत.

संतोष औताडे / मुख्य संपादक                   दिनांक -18/04/2022


अहमदनगर जिल्ह्यांत दरोडा , जबरी चोरी मोक्का गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. ९ , १२,००० / – ( नऊ लाख बारा हजार रु . किं चे १७२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत.


प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की , फिर्यादी श्री . दादासाहेब ज्ञानदेव मरकड , वय ४० , रा . खंडाळा , ता . श्रीरामपूर यांचे घराचा दरवाजा तोडुन , घरात प्रवेश करुन , कपाटातील सामानाची उचका पाचक करुन , घरातील पेट्या घराचे बाहेर घेवून जावुन १ , ९९ , ३५० / – रु.कि.चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने चोरुन घेवून गेले .. सदर घटने बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३/२०२२ भादविक ३ ९ ४ , ४५ ९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार नेवासा शहर व परिसरात पेट्रोलिंग करत असतांना पोनि / श्री . अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की , आरोपी नामे सचिन भोसले हा त्याचे साथीदारासह नेवासा येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने मोडण्यासाठी घेवून येणार आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सलाबतपुर , ता . नेवासा या परिसरातून आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवून सदर आरोपी हा नेवासा येथे चोरी केलेले सोने विकण्यासाठी खडकाफाटा मार्गे नेवाशाकडे एक काळे रंगाचे मोटार सायकलवर त्याचे दोन साथीदारासह येणार आहे . अशी खात्री होताच पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खडकाफाटा , ता . नेवासा येथे सापळा लावला , थोडयाच वेळात मिळालेल्या माहिती नुसार सलाबतपुर कडुन खडकाफाट्याकडे एका काळ्या रंगाचे मोटार सायकलवर अज्ञात तीन इसम येतांना पथकास दिसले . पोलीस पथकाची खात्री होताच त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल जोरात चालवुन नेवासा फाट्याच्या दिशेने जोरात जावु लागताच मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमास कॉलरला पकडुन धरुन ठेवले त्याच वेळी मोटार सायकलवरील पुढे बसलेले दोन इसम मोटार सायकल जोरात चालवुन नेवासा फाट्याच्या दिशेने पळून गेले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही . ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव व पत्ता १ ) सचिन सुरेश भोसले वय २३ , रा सलाबतपुर , ता . नेवासा असे असल्याचे सांगीतले . तसेच पळून गेलेल्या इसमांबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने त्यांची नावे १ ) असिफ नासिर शेख रा . वांळुज , जिल्हा औरंगाबाद , २ ) गुलब्या शिवाजी भोसले रा . गोंडेगांव , ता . नेवासा असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे सचिन सुरेश भोसले यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंग झडतीमध्ये एका पांढ – या गोणीच्या पिशवीमध्ये विविध सोन्याचे दागिने मिळुन आले . सदर मिळुन आलेल्या दागिन्या बाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने मागिल तीन चार महिन्यात श्रीरामपूर , नेवासा , कुकाणा , सोनई , पाथर्डी , जामखेड व एमआयडीसी परिसरात साथीदारासह चो – या केल्या असुन नेहमी प्रमाणे सदरचे सोने आम्ही आमचे ओळखीचा सोनार दादा संपत म्हस्के रा . नेवासा याचेकडे मोडण्यासाठी घेवुन चाललो होतो अशी माहिती दिली . एकुण ०८ गुन्हे दाखल असुन आरोपीनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे . सचिन भोसले वय २३ , रा . सलाबतपुर , ता . नेवासा हा विविध ठिकाणी विशेतः पुणे जिल्ह्यात आयोजित होणा – या बैल , घोडा व टांगा शर्यतेमध्ये सहभागी होवुन आपले अस्तित्व लपवुन गांवातील प्रतिष्ठीत लोकांचे शेतातील वस्तीवर वास्तव्य करत होता. नमुद आरोपी हा श्रीरामपूर शहर पो.स्टे . ६६ ९ / २१ भादविक ३ ९ ५ , ३ ९ ४ , ४५८ , १२० ( ब ) ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यास तपासाअंती आरोपी निष्पन्न होवुन गुन्ह्यास म.सं.गु.नि. कलम ( मोक्का ) ३ ( १ ) ( ग ) ३ ( २ ) व ( ४ ) वाढीव कलम लावण्यात आले होते . अहमदनगर जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी नामे सचिन सुरेश भोसले याचेवर मोक्का , दरोडा , दरोडा तयारी , जबरी चोरी व चोरी अशा गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे दाखल असुन त्या पैकी ०४ गुन्ह्यात आरोपी – ० ९ / २०१५ बी.पी अॅक्ट १२२ सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपूर व श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग व श्री . संजय सातव साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .·

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे