पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांना रौप्यपदक.पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मान.
संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा ) दिनांक- 26/07/2022
पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये महिला पोलीस
हवालदार अर्चना काळे यांना रौप्यपदक.पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मान.
सविस्तर माहिती- महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग सब ज्युनिअर, सिनियर, मास्टरर्स १४४, पॉवरलिफ्टिंग स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा, मुंबई या स्पर्धेत ५७ किलो वजनगटात महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी 105 वजन उचलून द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळविले.
अहमदनगर मधील पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अर्चना काळे यांनी स्पर्धेमध्ये पोलीस दलाचे नाव उंचावले.
नुकत्याच मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग सब ज्युनिअर, सिनियर, मास्टरर्स १४४, पॉवरलिफ्टिंग स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा, मुंबई या स्पर्धेत ५७ किलो वजनगटात महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी 105 वजन उचलून द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळविले.
या पूर्वी अर्चना काळे यांनी केरळ येथील त्रिवेंद्रम येथे झालेल्या मास्टर गेम्स फेडरेशन इंडिया चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत १०० मीटर रनिंग स्पर्धेत सिल्वर मेडल. २०० मीटर रनिंग स्पर्धेत कांस्य पदक ४०० मीटर रनिंग स्पर्धेत सिल्वर पदक पावर लिफ्टिंग स्पर्धेत ( वजन उचलणे ) ४२ वर्ष वयोगटात ५७ किलो वजनगटात सिल्वर मेडल मिळविले आहे.अर्चना काळे या अहमदनगर पोलिस दलात महिला पोलिस हवालदार म्हणून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष या विभागामध्ये कार्यरत आहेत
.यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अर्चना काळे यांचा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन विविध पदक मिळवल्याबद्दल व अहमदनगर पोलिस दलाचे नाव लौकीक केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला आहे.·