गुन्हेगारी
Trending

ऊस तोड मुकादमाचे वाहन आडवुन मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी ५,००,००० / – रु . रोख रक्कमेसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक : – २५ /०७ /२०२२


ऊस तोड मुकादमाचे वाहन आडवुन मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी ५,००,००० / – रु . रोख रक्कमेसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


.

प्रस्तुत बातमीची हकिगत कशी की , दिनांक २८/०६/२०२२ रोजी फिर्यादी श्री . संतोष शहादेव बर्डे वय ३६ , धंदा ऊसतोड मुकादम व शेती , रा . भिलवडे , ता . पाथडी , जिल्हा अहमदनगर हे त्यांचे भाऊ साक्षीदार बबन असे संत तुकाराम साखर कारखाना , मुळशी , जिल्हा पुणे येथुन त्यांचे कामकाजाचे ५,७०,००० / – रु . रोख व अजिनाथ कारभारी मिसाळ यांचे कामकाजाचे २,००,००० / – रु . रोख एकुण ७,७०,००० / – रु . रोख रक्कम मोटार सायकलवर घेवून घरी येत असतांना करंजीघाट , ता . पाथर्डी येथे दर्ग्या जवळ , त्यांचे पाठीमागुन एक स्कॉपीओ गाडी येवुन मोटार सायकलला कट मारुन स्कॉपीओ आडवी लावुन गाडीतील अज्ञात तीन इसमांनी मारहाण करुन , धाक दाखवुन मोटार सायकलचे डिकीमध्ये ठेवलेली वरील रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली आहे . सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ६५३ / २२ भादविक ३ ९ ४ , ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर

मा.डॉ.श्री . बी . जी . शेखर पाटील साहेब , विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी व मा.श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक सो अहमदनगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत पोनि / श्री . अनिल कटके यांना सुचना व मार्गदर्शन केले . नमुद सुचना प्रमाणे श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपासा बाबत सुचना दिल्या . त्याप्रमाणे पथकाने मोटार सायकल आडवुन मारहाण करुन जबरी चोरी करणा – या आरोपीतांची माहिती घेत असतांना पोनि / कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा पप्पु दराडे याने केला असुन , तो आता पागोरी पिंपळगांव , ता . पाथर्डी येथे त्याचे राहते घरी आलेला आहे . आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकातील पोसई / सोपान गोरे , सफी / मनोहर शेजवळ , पोहेकॉ / संदीप पवार , संदीप घोडके , देवेंद्र शेलार , पोना / संतोष लोढे , शंकर चौधरी , संदीप चव्हाण , दिपक शिंदे , विश्वास बेरड , पोकों / योगेश सातपुते , सागर ससाणे व चापोहेकों / संभाजी कोतकर अशांनी मिळून पागोरी पिंपळगांव , ता . पाथर्डी येथे जावून मिळालेल्या माहिती वरुन आरोपीचे घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम येतांना दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेवून नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे , वय ३२ , रा . पागोरी पिंपळगांव , ता . पाथर्डी असे असल्याचे सांगितले . त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला , त्यास अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा हा त्याचा साथीदार आंबादास नागरे , तात्याबा दहिफळे व दत्तु सातपुते असे सोबत मिळुन केल्याची कबुली दिली . पथकाने नमुद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी जावुन ताब्यात घेतले .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे