अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने आरोपी शरणागती व पोलीस पाल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.
संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक : – १८ /०७ /२०२२
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने आरोपी शरणागती व पोलीस पाल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.
. सविस्तर माहिती- मा.डॉ. श्री बी . जी . शेखर पाटील साहेब , विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे नाशिक परिक्षेत्र , कम्युनिटी पोलीसिंग मिशन अंतर्गत व मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांचे संकल्पनेतुन रविवार दिनांक १७/०७/२०२२ रोजी पेमराज सारडा महाविद्यालय येथे पोलीस व आरोपीचे पाल्य यांचे करीता रोजगार मेळावा व पोलीस मुख्यालय अहमदनगर येथे आरोपी शरणागती मेळावा आयोजित करण्यात आला होते . पोलीस , होमगार्ड , पारधी व इतर समाजातील आरोपींचे पुनर्वसन करण्याचे उद्देशाने त्यांचे पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने देशातील व विदेशातील नामांकित ५७ कंपन्यांशी संपर्क व अवाहन करुन संयुक्त रोजगार मेळाव्याचे आयोजन पेमराज सारडा महाविद्यालय , अहमदनगर येथे करण्यात आले होते . सदर मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसुन आला सदर प्रक्रियेत उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते . मेळाव्यात उपस्थित देश विदेशातील कंपनीचे प्रतिनिधी यांनी उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता व कागदपत्रांची पडताळणी करुन कंपनीमध्ये पात्र उमेदवारांना कामकाज करण्याची संधी दिलेली असुन त्यापैकी ४६० उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे व प्रातिनिधीक स्वरुपात काही उमेदवारांना मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे हस्ते देण्यात आलेली आहेत . त्या बाबत माहिती खालील प्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष सहभाग नियुक्ती प्रत्यक्ष नियुक्त २५७२ १८६० १०२३ ४६० रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सोहळ्या वेळी श्री . राजेंद्र भवारी , प्रकल्प अधिकारी , आदिवासी विकास प्रकल्प , राजुर , अकोले , श्री . शिवाजी शिर्के , श्री . अशोक सोनवणे , श्री . मन्सुर सय्यद , श्री . साहेबराव कोकणे , श्री . उमर सय्यद , श्री . करण नवले , श्री . अशोक झोटींग , श्री . सुशिल थोरात , श्री . बाळासाहेब शेटे , श्री . सचिन अगरवाल , श्री . सागर दुस्सल , श्री . सुनिल भोंगळ , श्री . लयलेश बारगजे व श्री . कुणाल जायकर असे मान्यवर उपस्थित होते . तसेच मुख्य कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पद्मभुषण मा . श्री . आण्णा हजारे , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . डॉ . श्री . बी . जी.शेखर पाटील साहेब , श्री . सुधीर लंके ,श्री. पञकार संतोष औताडे, श्री . प्रकाश पाटील , श्री . सुभाष गुंदेचा , श्री . राजेंद्र झोंड , श्री . अनिरुध्द देवचके , श्री . जयंत कुलकर्णी , श्री . विजयसिंह होलम , श्री . मोहिनीराज लहाडे , श्री . महेंद्र कुलकणी यांचे उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला . तसेच जिल्ह्यातील विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पदाधिकारी असे मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यक्रम मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपूर व श्री . अजित पाटील उविपोअ , नगर ग्रामिण विभाग व श्री . संदीप मिटके , उबिपोअ , श्रीरामपूर विभाग तसेच जिल्ह्यातील इतर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधिकारी , अंमलदार उपस्थित होते.