समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करतांना बस नदीत कोसळली 13 प्रवाशांचा मृत्यू.बचाव कार्यासठी NDRF दाखल.
संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक- 18/07/2022
समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करतांना बस नदीत कोसळली 13 प्रवाशांचा मृत्यू.बचाव कार्यासठी NDRF दाखल.
सविस्तर माहिती- नदीत पडलेली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची असून , ही बस सकाळी इंदौरहून पुण्याला निघाली होती . अपघातापूर्वी बसने खलघाट येथे 10 मिनिटांचा ब्रेक घेतला होता , त्यानंतर ती सकाळी 10:45 वाजता नर्मदा नदीत पडली . समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनाला वाचवताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले . त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली कोसळली.जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने धामनोद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे . घटनास्थळी धामनोद पोलीस व खालटाका पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोताखोर व परिसरातील नागरिक बचावकार्यात गुंतले आहेत , बसमधील प्रवाशांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही . धार – खरगोन सीमेवर अपघातातील बसमध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी होते . त्यापैकी 13 प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.तसेच 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. बचाव कार्य चालू असुन. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे . बस इंदूरहून पुण्याला जात होती 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे गोताखोरांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. महाराष्ट्र रोडवेजची बस पुलावरून कोसळल्यानंतर ही बस नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत पडली . या विचित्र अपघातामुळे अनेक जण जखमी झाले . यात बसचा चक्काचूर झाला . अपघातातून बचावलेले प्रवासी यांनी जवळपासच्या खडकांचा आधार घेत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत केले . तर काहीजण पोहत किनाऱ्यापाशी पोहोचले . या घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे , याचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच समोर येईल . तोपर्यंत नागरिकांनी बचावकार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.