ह.भ.प. कृष्णा महाराज मते ( प्रकाशानंदगिरीजी महाराज ) यांचा. देवगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून विधीवत दीक्षा सोहळा

संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक- 07/05/2022.
ह.भ.प. कृष्णा महाराज मते ( प्रकाशानंदगिरीजी महाराज ) यांचा. देवगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून विधीवत दीक्षा सोहळा संपन्न.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील प.पु. गुरुवर्य भास्करगिरिजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व प्रेरणेने भागवताचार्य ह.भ.प. कृष्णा महाराज मते ( प्रकाशानंदगिरीजी महाराज ) यांची आज देवगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून विधीवत दीक्षा घेतली . हा पंच संस्कार दीक्षा सोहळा मोठ्या भक्तीभावात , आनंदात व संत महंतांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवगड संस्थानवर असलेली भक्ती , श्रद्धा व निष्ठा दाखवत या धार्मिक सोहळयाचा आनंद घेतला . देवगड संस्थानवरील कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातून तसेच राज्यातुन व परराज्यातुन उपस्थित असलेल्या हजारो भाविकांचे श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या वतीने सर्वांचे विनम्र आभार मानले . ह.भ.प. कृष्णा महाराज मते यांचे जन्मगाव नेवासा तालुक्यातील गोगलगाव असून त्यांचे शिक्षण नेवासा येथे 12 वी ( सायन्स ) पर्यंत झालेले आहे .
त्यांनी आळंदी येथे सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत चार वर्षे अध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर वृंदावनधाम येथे 2 वर्षे श्रीमद भागवत कथेचा अभ्यास केला . त्यानंतर सलग 5 वर्षे पंढरपूर येथे चातुर्मास केले . त्यानंतर गणेशखिंड येथे असलेल्या हनुमान गड संस्थानची सलग 9 वर्षे मनोभावे जबाबदारी सांभाळली . सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती , मनमिळाऊ व सकारात्मक स्वभाव हे सर्व गुण पाहून आपल्या नंतर देवगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून गुरुवर्य बाबांनी त्यांची सार्थ निवड करून आज संत – महंताच्या व ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात व जयघोषात पंचसंस्कार दीक्षा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.