गुन्हेगारी
Trending

अहमदनगर शहरातील हॉस्पीटल बाहेरुन मोपेडच्या डिक्कीतुन ३,१५,००० / – रु . रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

संतोष औताडे / मुख्य संपादक.             दिनांक : -०१/०५ /२०२२


अहमदनगर शहरातील हॉस्पीटल बाहेरुन मोपेडच्या डिक्कीतुन ३,१५,००० / – रु . रोख रक्कम  मोटारसायकल सह  आरोपी जेरबंद


सविस्तर माहिती- , दिनांक २ ९ / ०४ / २०२२ रोजी फिर्यादी श्री . सागर अनिल पवार वय ३० , रा . नेप्ती , ता . नगर यांनी लालटाकी येथील बँकेतून ३,३०,००० / – रु . रोख रक्कम काढुन मित्र श्री . सुनिल कांडेकर यांचे ऑपरेशन करीता मोपेड़ गाडी क्र . एमएच / १६ / सीएम / ३३४३ हिचे डिक्कीमध्ये ठेवली होती . फिर्यादी मोपेडगाडी घेवून सिटी केअर हॉस्पीटल , तारकपुर अहमदनगर येथील पार्किंगमध्ये गाडी लावुन हॉस्पीटलमध्ये पेशंटला भेटण्यासाठी गेले होते . दरम्यान अज्ञात चोरट्याने मोपेडगाडीच्या डिक्कीचे लॉक तोडुन रोख रक्कम स्वतःचे फायद्या करीता चोरून नेली होती . सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४२ / २०२२ भादविक ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमदनगर,LCB चे निरीक्षक अनिल कटके साहेब यांच्या

 

मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / बबन बेरड हे नेवासा परिसरात आरोपीची माहिती व शोध घेत असतांना पोनि / श्री . अनिल कटके यांना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की , संशयीत दोन इसम मोटार सायकलसह नेवासा रोडने औरंगाबादकडे पळून जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा , अहमदनगर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ औरंगाबाद रोडने जावुन संशयीत इसमांचा पाठलाग सुरु केला . पाठलाग सुरु असतांना पथकातील पोलीस अधिकारी यांनी मिळालेली माहिती सपोनि / माने , बिडकीन पोलीस स्टेशन व पोसई प्रदीप ठुबे , पोना / खंदारे , पोना / मेटे , पोना / वाल्मिक निकम स्थानिक गुन्हे शाखा , औरंगाबाद प्रामिण यांना कळवून संशयीत इसमास ताब्यात घेणे बाबत मदत घेवून चितेगांव टोलनाका येथे नाकाबंदी लावली . थोडाच वेळात नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहिती प्रमाणे दोन संशयीत इसम मोटार सायकलवर येताना दिसले . त्यांना थांबण्याचा इशारा करताच ते औरंगाबादच्या दिशेने पळुन जावु लागले . मोटार सायकल वरील संशयीत इसमांना पथकाने आडवले . त्याचवेळी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला इसम पळून गेला व मोटार सायकल चालकास मोटार सायकल व बॅगसह शिताफीने ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) रमेश रामु कोळी , वय ३२ , रा . विजयवाडा रेल्वे स्टेशन जवळ , आंध्र प्रदेश हल्ली रा . हिनानगर , चिकलठाणा , जिल्हा बुलढाणा असे असल्याचे सांगितले . तसेच त्याचेकडे पळून गेलेल्या इसमा बाबत विचारपुस करता त्याने त्याचे नाव २ ) अशोक राम गाजवार , रा . विजयवाडा रेल्वे स्टेशन जवळ , आंध्र प्रदेश र दिनानगर , चिकलठाणा , जिल्हा बुलढाणा ( फरार ) असे सांगितले.आरोपी नामे रमेश कोळी यांचे जवळ मिळून आलेल्या बॅगेची पंचासमक्ष झडती घेतली असता बैगेमध्ये रोख ३,१५,००० / – रु . रोख रक्कम , ७०,००० / – रु . किं . ची युनिकॉन मोटार सायकल व १,००० / रु . कि . या मोबाईल असा एकुण ३,८६,००० / – रु . किचा मुद्देमाल मिळुन आला . सदर रकमे बाबत विचारपुस करता त्याने सदर रक्कम दि . २ ९ / ०४ / २०२२ रोजी अहमदनगर शहरातुन चोरी केल्याचे सांगितली . सदर चोरीच्या घटनेबाबत अहमदनगर जिल्हातील गुन्हे अभिलेख पडताळणी करता दिनांक २ ९ / ०४ / २०२२ रोजी अहमदनगर शहरात तोफखाना पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने आरोपीस मुरेमालासह ताब्यात घेवून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . अनिल कातकाडे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे