अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत दि . 01/05/2022 ते दि . 05/05/2022 पर्यंत पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी

संतोष औताडे / मुख्य संपादक. दिनांक- 29/04/2022
अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत दि . 01/05/2022 ते दि . 05/05/2022 पर्यंत पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी
दि . 29/04/2022 रोजीचे पत्रानुसार अहमदनगर जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात दिनांक 03/05/2022 रोजी ( एक दिवस मागे किंवा पुढे चंद्रदर्शनावर अवलंबुन ) रमजान ईद हा सण उत्सव साजरा होणार आहे . तसेच त्याच दिवशी अक्षयतृतिया हा सण देखील साजरा केला जाणार आहे . तसेच जिल्हयांमध्ये विविध राजकीय पक्ष , कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे , धरणे आंदोलने , रास्ता रोको होतात . त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये . यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. . , वरील पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता , कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे अनुषंगाने पोलीसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये , यासाठी मी , जिल्हादंडाधिकारी अहमदनगर , मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कोणाही इसमास खालील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे . ( अ ) शस्त्रे , काठया , सोटे , तलवारी , भाले , सुरे , बंदुका , दंडे अगर लाठया किंवा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे . ( ब ) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे . कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे . ( ड ) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे . ( इ ) जाहीरपणे घोषणा देणे , ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरणसंच वापरणे किंवा वाजवणे . ( ई ) सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे , आवेशपूर्ण भाषणे करणे , हावभाव करणे किंवा सोंग
आणणे अगर तशी चित्रे , चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे .