
संतोष औताडे / मुख्य संपादक. दिनांक- 01/05/2022
Dysp संदीप मिटके यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान*
सविस्तर माहिती- राज्याचे ग्रामविकास , कामगार मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे आयोजित शासकीय मुख्य समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले त्यावेळी श्री हसन मुश्रीफ बोलत होतें. या समारंभात जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले , जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे , महानगर पालिका आयुक्त जिल्हयातील स्वांतत्र सैनिक , शंकर गोरे , ज्येष्ठ नागरिक , विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते . अहमदनगर जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी म्हणून Dysp संदिप मिटके यांची ओळख आहे.
Dysp संदिप मिटके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ओलीस ठेवलेल्या निरपराध कुटुंबीयांची शस्त्रधारी सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून सुटका केली होती. त्यांनी उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठेने, वोनिर्भीडपणे आणि शौर्याने महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली होती.आपले कौशल्य कायम राखून असाधारण वीरतेचे व अद्वितीय कर्तव्याचे पालन केले. त्यांच्या या प्रशंसनीय स्वरूपाच्या दृश्य व अति उत्तम कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह त्यांना जाहीर करण्यात आले होते.
तसेच अहमदनगर पोलीस दलातील ASI जितेंद्र ढवळे, PN माधुरी तोडमल, PN दीपक घाटकर यांना देखील जाहीर झाले आहेत.