पेट्रोल पंपावर दरोडे घालणारा मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे / मुख्य संपादक. दि.17/04/2022
पेट्रोल पंपावर दरोडे घालणारा मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत- दिनांक ०१/०८/२०२१ रोजी पहाटे ०३.०० वा.चे सुमारास फिर्यादी श्री . अक्षय कुंडलीक गोल्हार , वय ३० वर्षे , रा . कोहीनूर मंगल कार्यालयासमोर , सावेडी , अहमदनगर यांचे मालकीचे नगर – सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात ७ ते ८ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करुन व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल , रोख रक्कम असा एकूण २,५५,८०० / – रु . रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता . सदर घटनेबाबत नगर तालूका पो.स्टे . येथे गुरनं . ४३४/२०२१ , भादवि कलम ३ ९ ५ , ९ ७ सह आर्म अॅक्ट कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता
. मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांचे सुचनाप्रमाणे पोनि / अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे तपास करुन आरोपी नामे १ ) कृष्णा विलास भोसले , वय २२ वर्षे , रा . हातवळण दाखले , ता . आष्टी , बीड , २ ) सुरेश पुंजाराम काळे , वय ३८ वर्षे , रा . सोनवीर , ता . शेवगाव , जि . अ.नगर , ३ ) रावसाहेब विलास भोसले , वय ४० वर्षे , रा . हातवळण दाखले , ता . आष्टी , जि . बीड , ४ ) अजिनाथ विलास भोसले , वय २५ वर्षे , रा . हातवळण दाखले , ता . आष्टी , जि . बीड यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले . आरोपीकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचे गुन्हे हे त्यांचे साथीदार १ ) भरत विलास भोसले , रा . हातवळण , ता . आष्टी पवन यूनूस काळे , रा . गुनवडी , ता . नगर ( फरार ) अशांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले होते . तपासा दरम्यान सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १ ९९९ चे ( मोक्का ) कलम ३ ( १ ) ( II ) , ३ ( २ ) व ३ ( ४ ) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आलेले होते . जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी विरुध्द कर्जत पोस्टे गु.र.नं. ५१ ९ / २ ९ भादवि कलम ३ ९ ४ , ३४ प्रमाणे दाखल असुन आरोपीकडे नमुद गुन्ह्या बाबत चौकशी करता आरोपी नामे पवन युनूस काळे याने त्यांचे साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे . आरोपी नामे पवन युनूस काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोस्टेला दरोडा , जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण १८ गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल. अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . अजित पाटील साहेब , उविपोअ नगर ग्रामिण विभाग व श्री . आण्णासाहेब जाधव , उविपोअ , कर्जत विभाग यांचे सुचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .·