बेकायदेशिर शस्त्रे कब्जात बाळगणारा आरोपी ३०,५०० /रूपये ,एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह जेरबंद.

संतोष औताडे / मुख्य संपादक. दिनांक :14/04/2022
बेकायदेशिर शस्त्रे कब्जात बाळगणारा आरोपी ३०,५०० /रूपये ,एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .सविस्तर माहिती- दिनांक १४/०४/२०२२ रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती , भगवान महावीर जयंती , दिनांक १५/०४/२०२२ रोजी गुड फ्रायडे , दिनांक १६/०४/२०२२ रोजी श्री . हनुमान जयंती व दिनांक
१७/०४/२०२२ रोजी इंस्टरसंडे या आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा विक्री करणारे आरोपींची माहिती काढून त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना सूचना दिल्या होत्या . सुचनांचे अनुषंगाने पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा अहमदनगर नमुद आदेशान्वये सपोनि / सोमनाथ दिवटे , पोहेकॉ / मनोहर गोसावी , देवेंद्र शेलार , पोकों / सागर ससाणे , रविंद्र घुंगासे , रोहित येमुल , मेघराज कोल्हे व चापोहेकॉ / उमाकांत गावडे असे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणारे आरोपींची माहिती घेत असतांना श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , यांना गुप्त खवन्याकडून माहिती मिळाली कि , एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी बीफ मार्केट , वॉर्ड नं .२ परिसर येथे येणार आहे . आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि सो . यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना नमुद हकिगत कळवून आरोपीची खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंचासह वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी बीफ मार्केट , वॉर्ड नं . २. श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला . त्यानंतर काही वेळातच एक संशयीत इसम बीफ मार्केट परिसरात फिरतांना दिसला . त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्यास पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता १ ) अंजर इलीयाज शहा वय २२ , रा . बीफ मार्केट जवळ , वॉर्ड नं . २ , ता . श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले . त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण ३०,५०० / रु . किं . चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले . वरील नमुद इसम नामे १ ) अंजर इलीयाज शहा वय २२ , रा . बीफ मार्केट जवळ , वॉर्ड नं . २ , ता . श्रीरामपूर हा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकों / २३८३ रविंद्र तुकाराम घुगांसे ने . स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . २६८ / २०२२ , आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत . सदर कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर , श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग , यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .