ब्रेकिंग
Trending

कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना पत्नी व लहान मुलाची हत्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ.

संतोष औताडे / मुख्य संपादक.               दिनांक- 10 एप्रिल 2022


कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना पत्नी व लहान मुलाची हत्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ.


सविस्तर माहिती- श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.कौंटुंबिक वादातून आपल्या
पत्नीच्या डोक्यात कुदळीने वार करून तिचा खून केला व त्यानंतर पाच वर्षाच्या मुलाला आंब्याच्या झाडाला फाशी देऊन ठार केल्याची घटना घडली आहे.सदर ईसमान स्वतः त्याचा व्हिडिओ करून कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना पाठवला होता. त्यांनतर गावातील पोलीस पाटलाला फोन करून घटनास्थळी बोलावले व सर्व माहिती दिली. तालुक्यातील गोंधवणी डिगी आणि निमगाव खैरी गावाच्या शिवारात ही धक्कादायक घटना घडली.

रामनवमीच्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने श्रीरामपूरसह जिल्हा हादरला. बलराम दत्तात्रेय कुदळे (वय 40 ) असे आरोपीचे नाव आहे.अक्षता बलराम कुदळे (वय 35 वर्ष) मुलगा शिवतेज (वय 5वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

कुदळे कुटुंबीय गोंधवणी गावात राहते. बलराम याचे त्याच्या आई-वडिलांशी पटत नव्हते. तो पत्नी व मुलासह शेतात घर बांधून राहत होता. त्यांच्यातही काही दिवसांपासून भांडणे होत होती. भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह काही दिवस माहेरी राहिली नुकतीच ती पुन्हा आपल्या घरी आली होती. सहा महिन्यापासून बलराम पत्नी व मुलाची हत्या करण्याचा कट रचत होता. आज त्याला संधी ती मिळाली. घरासमोर पत्नी काम करत असताना बलरामने पाठीमागून जाऊन तिच्या डोक्यात कुदळीने वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पाच वर्षांचा मुलगा शिवतेज याला त्याने घरापासून सुमारे शंभर फूट अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाला फाशी दिली. मुलाचा जीव जाईपर्यंत सुमारे दहा ते पंधरा मिनिटे तो तेथेच थांबला. त्यानंतर या थरार नाट्याचे मोबाईल वर चित्रीकरण करून बलराम याने स्वतः ही घटनेची कुटुंबीयांना व गावकऱ्यांना चित्रफित पाठवली. आरोपीने दिघीचे पोलीस पाटील यांना फोन करून दोन खून झाल्याबद्दल माहिती दिली व त्यांना घटनास्थळी बोलावले. यावेळी आरोपी बलराम यानेच माझ्या विरोधात फिर्याद द्या असं सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे