गुन्हेगारी
Trending

२८ वर्षापासून प्रलंबित असलेला एकुण ९९ ७ किलो २७४ ग्रॅम अंमली पदार्थ ( गांजा / अफु ) अहमदनगर पोलिसांनी केला नष्ट

संतोष औताडे / मुख्य संपादक                   दि.26/0/22022


अहमदनगर जिल्ह्यातील २८ वर्षापासून प्रलंबित असलेला एकुण ९९ ७ किलो २७४ ग्रॅम अंमली पदार्थ ( गांजा / अफु ) नाश करण्यात आला आहे· 

 

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची कारवाई प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की , अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १ ९ ८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात सन १ ९९ ४ ते २०१४ पावेतो ३२ गुन्ह्यात एकुण ९९ ७ किलो २७४ ग्रॅम गांजा / अफु जप्त करण्यात आला होता . नमुद गुन्ह्यांचा मुदतीत तपास पुर्ण करुन मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते . मा . न्यायालयात नियमित सुनावणी होवुन न्यायालयीन प्रक्रियापुर्ण करुन मा न्यायालयाने मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश दिले होते . मा . पोलीस महासंचालक सो . महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील आदेशान्वये मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक सो . अहमदनगर यांचे अध्यक्षते खाली मा . श्री . सौरभ कुमार अग्रवाल ( सदस्य ) तथा अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर , मा . श्री . मेघश्याम डांगे ( सदस्य ) तथा पोलीस उपअधिक्षक ( गृह ) अहमदनगर , मा . श्री . अनिल कटके ( सदस्य ) पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ / विष्णु घोडेचोर , पोहेकॉ / भाऊसाहेब कुरुंद , पोहेकॉ / सखाराम मोटे , पोहेकॉ / शरद बुधवंत , पोहेकॉ / देवेंद्र शेलार , पोना / शंकर चौधरी , पोकॉ / जयराम जंगले , चापोहेकॉ / अर्जुन बडे व चापोहेकॉ / बबन बेरड अशांनी अहमदनगर जिल्हयातील सन १ ९९ ४ ते २०१४ पावेतो ३२ गुन्ह्यात एकुण ९९ ७ किलो २७४ ग्रॅम गांजा / अफु असा प्रदिर्घ काळापासुन नाश करणेसाठी प्रलंबित असलेला अंमली पदार्थ ( गांजा / अफु ) नाश करण्याची योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन आज शनिवार दिनांक २६/०२/२०२२ रोजी राजंणगांव एमआयडीसी , जिल्हा पुणे येथील कंपनीत नाश केला आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमदनगर , मा . श्री . सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर , मा . श्री . मेघश्याम डांगे , पोलीस उप अधिक्षक ( गृह अहमदनगर , मा . श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी पुर्ण केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे