गुन्हेगारी
Trending

अहमदनगर येथील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे / मुख्य संपादक.                    दि. 24/02/2022              अहमदनगर येथील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.सविस्तर माहिती- अहमदनगर लालटाकी येथील खूनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. फिर्यादी माया वसंत शिरसाठ , वय ३५ , रा . भारस्कर कॉलनी , लालटाकी , अहमदनगर यांची बहिण भारती दिपक आव्हाड , रा . पाथर्डी व फिर्यादी यांचे शेजारी राहणारे सारीका संतोष भारस्कर यांचे नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती . त्या कारणावरुन दिनांक १० / ०४ / २०१ ९ रोजी दुपारचे वेळी सारीका संतोष भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन विक्रम दिनकर , विक्रम लहानू दिनकर , मुकेश विष्णू दिनकर व इतर १४ ते १५ आरोपींनी फिर्यादी माया शिरसाठ यांना तसेच त्यांची सासु बेबी अर्जून शिरसाठ , दिर सचिन शिरसाठ , विनोद शिरसाठ , संतोष शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके , चाकू , तलवारी या हत्यारांनी मारहाण करुन जखमी करुन फिर्यादी यांची सासु बेबी अर्जुन शिरसाठ यांची हत्या केली होती . सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यावरुन गुरनं . ५ ९९ / २०१ ९ , भादवि कलम ३०२ , १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ३०७ , ५०४ , ५०६ सह भाहकाक ४/२५ सह मपोकाक ३१ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे एकूण १ ९ आरोपी विरुध्द दाखल करण्यात आलेला आहे . मा . पोलीस अधिक्षक श्री . मनोज पाटील साहेब यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत पोनि / श्री अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा अ . नगर यांना आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा , अ.नगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे स्वंतत्र पथकाची नेमणुक करुन फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले . नमुद सुचना प्रमाणे स्थागुशा पथकातील अंमलदार फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असतांना पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा , अ.नगर यांन गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी नामे संतोष भारस्कर हा पाथर्डी येथे आले असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने , पोनि / श्री . कटके यांनी मिळालेल्या बातमीतील आरोपीची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकातील सफौ / राजेंद्र वाघ , संजय खंडागळे , पोहेकॉ / बापुसाहेब फोलाने , पोना / भिमराज खसे , देवेंद्र शेलार अशांनी मिळुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीस शिताफीने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष बबन भारस्कर वय ४ ९ , रा . लालटाकी , अहमदनगर असे सांगितले त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला . त्यास अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री . सौरभ कुमार आग्रवाल , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर व श्री . अजित कातकडे साहेब , उपविभागीय अधिकारी , नगर शहर विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे