बनावट सोन्यावर नकली हॉलमार्कचा शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनसह 6 आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक-13 सप्टेबर 2022
बनावट सोन्यावर नकली हॉलमार्कचा शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनसह 6 आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद.
सविस्तर माहिती- कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे दि . ०७ / ० ९ / २०२२ रोजी फिर्यादी श्री . दिनेश सुधाकर कुलकर्णी य ( ५५ वर्षे धंदा बैंक मैनेजर , अहमदनगर शहर सहकारी बँक , सक्कर चौक शाखा , अहमदनगर रा . सातपुते तालीम जवळ नालेगाव , अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि न ६ ९ ० / २०२२ भादवि कलम १२० ( ब ) ४० ९ , ४२०,४६५,४६८,४७५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . नमुद गुन्हयात दि . ०८ / ० ९ / २०२२ रोजी आरोपी ०१ ) अजय किशोर कपाले , वय ३३ वर्षे , धंदा गोल्ड व्हॅल्युअर रा.बालीकाश्रम रोड , वन उदयान जवळ , इस्सार पेट्रोलपंप पासुन आतमध्ये , अहमदनगर , ०२ ) विशाल संजय चिपाडे , वय २८ रा . चिपाडे मळा , सारसनगर , अहमदनगर , ०३ ) ज्ञानेश्वर रतन कुताळ वय २८ रा . चिपाडे मळा , सारसनगर , अहमदनगर .०४ ) सुनिल ज्ञानेश्वर आळकुटे वय ३८ वर्षे रा सदगुरु टॉवर्स , गायकवाड हॉस्पीटल जवळ , तपोवन रोड , अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे . नमुद आरोपी पैकी आरोपी क ०२ ते ०४ यांचे शहर सहाकरी बँक , सक्कर चौक शाखा अहमदनगर येथे सोने तारण खाते सरकारमान्य गोल्ड व्हॅल्युअर यांचेकडुन तपासले असता ते बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे . तसेच तपासादम्यान अटक आरोपीतांनी संगनमताने कट रचुन नमुद बँकेतील इतर खातेधाराच्या नावावर देखील बनावट सोने तारण प्रकरणे केली असल्याचे सांगितल्याने इमस नाम ०१ ) उस्मान अजिज तांबोळी , ०२ ) साजीद अजित तांबोळी , ०३ ) जैन्नुदीन पापानिया पठाण , ०४ ) अभिषेक पांडुरंग चौगुले , ०५ ) राहुल सुधाकर शिंदे , ०६ ) यासिन नासर आरब .०७ ) वसीम निसार शेख , ०८ ) अनिल मल्लेश दिकोंडा , ० ९ ) दिपक विरबहाददुर राजपुत , १० ) महेश प्रदिप पालवे , ११ ) मयुर सुरेश बुळे , १२ ) सतिश रामदा पडोळे , १३ ) कालीदास सोन्याचापु कोकरे , १४ ) विराज सुनिल ढोरे , १५ ) संदीप सिताराम कदम , १६ ) चेतन चोरडीया , १७ ) अल्का चोरडीया यांचे वर नमुद शाखेमध्ये बनावट सोने तारण कर्ज प्रकरण खाते चेक केले असता सदरच्या सोने तारण ठेवी हया बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे .. तसेच दि . १० / ० ९ / २०२२ रोजी आरोपी क्र ०१ ते ०४ यांचे कटात सहभागी असणारा आरोपी संदीप सिताराम कदम रा . निमगांव वाघा , ता . नगर , जि . अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे . तसेच आरोपी क्र ०१ ते ०४ यांच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये दि . ३१ / ० ९ / २०२२ रोजी पंचासमक्ष घरझडत्या घेतल्या असता त्यांचे घरझतीमध्ये शहर सहकारी बँक , श्री . संत नागेबाबा पंतसंस्था केडगांव शखा , महात्मा फुले पतसंस्था आलमगिर या शाखेतील सोने तारण कर्ज पावत्या मिळून आल्याने त्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत . तसेच मुख्य आरोपी अजय कपाले यांचेकडून दि ११ / ० ९ / २०२२ रोजी बनावट सोन्यावर हॉलमार्कचा शिक्का मारण्याचे मशिन व बनावट सोने हे केडगाव येथील एका भाडोत्री गाळयामधून जप्त करण्यात आले . तसेच आरोपी क्र ०१ ते ५ यांचे कटात सहभागी असणारा आरोपी श्रीतेश रमेश पानपाटील रा . भिंगार यास दि . ११ / ० ९ / २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे सदर गुन्हयात कटात सहभागी असणारे एकूण ०६ आरोपी हे अटक असुन आरोपी यांना दि . १५ / ० ९ / २०२२ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मा . न्यायालयाने दिलेला आहे . तसेच इतर बनावट सोने असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झालेल्या आरोपीतांकडे तपास चालु आहे . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे हे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत . तसेच आजपर्यंतच्या तपासामध्ये वरील नमुद आरोपीतांनी एकूण ५ ९ २६ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून २,२०,१३,००० / – रुपये इतकी रक्कम कर्ज स्वरुपात प्राप्त करुन बँकेची फसवणूक केली आहे . तसेच बँकेमध्ये त्याचे व्हॅल्युएशन रक्कम ही २,७०,३६,८४० / – रुपये अशी असल्याची माहिती प्राप्त आहे . सदरचा तपास व कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सारे , मा अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ कुमार अग्रवाल सो , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी श्री . अनिल कातकडे सारे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री . संपतराव शिंदे साहेब यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे सो पोको १४६४ / अभय कदम , पोना ५४० / बापुसाहेब गोरे , पोकों २१३१ / गणेश ढोबळे , पोहेको ३ ९९ / दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना १३८१ / सलिम शेख , पोना १ ९ ०० / बडडु भागवत , पोको १७६१ / सुमित गवळी , पोको २५७१ / अतुल काजळे यांनी केली आहे.