ब्रेकिंग
Trending

नेवासे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीसांची संयुक्त कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक : – १८ /०५ /२०२२


नेवासे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीसांची संयुक्त कारवाई.


. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी – , दिनांक ०७/०५/२०२२ रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे फुस लावुन , आमिष दाखवून अपहरण झाले होते . फिर्यादी यांना त्यांचे शेजारी राहणारा अलीम राजु शेख याचेवर संशय आल्याने त्यांनी नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७ ९ / २०२२ भादविक ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन , आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले होते . सपोनि / गणेश इंगळे , पोहेकॉ / दत्तात्रय गव्हाणे , मनोहर गोसावी , देवेंद्र शेलार , पोना / शंकर चौधरी , सुरेश माळी , संदीप दरदंले , रवि सोनटक्के , फुरखान शेख , मपोका सारीका दरेकर व चापोहेकॉ / संभाजी कोतकर अशांनी मिळुन नेवासा परिसरात आरोपींचा शोध घेत असतांना

, नेवासा पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी वापरत असलेला मोबाईल क्रमांकाची माहिती मिळाली नमुद मोबाईल क्रमांकाचे आधारे मोबाईल सेल विभाग , स्थागुशा अहमदनगर व अपर पोलीस अधिक्षक कार्यालय , श्रीरामपूर येथील मोबाईल सेल यांचे संयुक्त तांत्रिक विश्लेषणाचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा पोलीसांचे मदतीने आरोपी व अपहरत अल्पवयीन मुलगी यांना कोलवा बीच , गोवा येथुन ताब्यात घेतले . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अलीम राजु शेख , वय २२ , रा . आंतरवली , ता . नेवासा असे असल्याचे सांगितले त्यांना नेवासा येथे आणुन खात्री करुन नेवासा पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले . पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व श्री . सुदर्शन मुंढे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगांव विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे पोनि / बाजीराव पवार व पोनि / विजय करे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे