संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक -18/08/2026.
भेंडा येथे जबरी चोरी 1,87,000 रू मुद्देमाल लंपास भेंडा परिसरात खळबळ. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील कारखाना परिसरात राहणारे मोहन दुधाळे यांच्या राहत्या घरी अज्ञात चार जणांनी जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या बाबत मोहन दुधाळे यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की
मी मोहन चांगदेव दुधाळे वय 60 वर्ष धंदा – नोकरी(साखर कारखाना) रा.बी. टाईप कॉर्टर भेंडा
कारखाना ता.नेवासा जि.अहिल्यानगर मो.नं. 9850386799
समक्ष नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवुन लेखी फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी पत्नी-
कांता, असे आम्ही एकत्र कुटुंबात राहण्यास असुन मी भेंडा कारखाना येथे इंजिनियर म्हणुन नेमणुकीस आहे
मला मुलबाळ काहीच नाही.
दि. 16/08/2026 रोजी रात्री 10/00 वाजेच्या सुमारास मी व माझी पत्नी असे आम्ही जेवण
करुन झोपी गेलो होतो. पहाटे 02/30 ते 03/00 वा.च्या सुमारास आमचे बेडरुममध्ये अचानक चार
अनोळखी चोर आले त्यांच्या हातामध्ये एक लोखंडी चाकु व एक लांकडी दांडा होता. मी आरडा ओरडा
करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील दोघांनी मला त्यांच्या हातातील लोखंडी चाकुचा धाक दाखवुन माझे
दोन्ही हात व तोंड बांधुन माझे उजवे हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली त्याचवेळी माझी
पत्नी कांता ही देखील झोपेतून उठली असता त्यातील एकाने तीस चाकू दाखवुन तीचे गळ्यातील
मनी मंगळसुत्र व कानातील सोन्याच्या रिंग बळजबरीने काढून घेवुन कपाट मध्ये ठेवलेले 67,000/- रुपये
रोख रक्कम घेवुन सदर चारही अनोळखी चोर तुम अभी सो जाओ असे म्हणुन आमचे घराचे
दरवाजाला बाहेरुन कडी लावुन निघुन गेले. त्यावेळी आम्ही उठुन पाहीले असता घरामध्ये व घराचे बाहेर
मीर्ची पावडर टाकलेली दिसली. या घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली होती. चोरीस गेलेले मालाचे वर्णन खालीलप्रमाणे-
1) 40,000/- रु किं.चे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र जु.वा.कि. अं.
2) 30,000/- रु.किं.चे 3 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या रिंगा जु.वा. किं.अं.
3) 50,000/- रु.किं.ची एक 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जु.वा. किं.अं.
4) 67,000/- रुपये रोख रक्कम त्यात विविध दराच्या चलनी नोटा.
1,87,000/-रुपये एकुण
तरी दि.16/08/2026 रोजी रात्री 10/00 ते दि.17/08/2026 रोजी पहाटे 02/30 वा.ते 03/00 रोजीचे
पहाटे च्या दरम्यान बी.टाईप कॉर्टर भेंडा कारखाना ता. नेवासा येथील आमचे राहते घराचे दरवाजाचा कुलुप
कोंडा तोडुन, चार अनोळखी चोरट्यांनी आमचे घरात बळजबरीने चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करुन
माझे हात व तोंड बांधुन चाकुचा व लाकडी काठीचा धाक दाखवुन घरामध्ये व घराबाहेर मीर्ची पावडर टाकुन
सोन्याचे दागीने व रोख रक्कम ही बळजबरीने चोरुन घेवुन गेले आहेत म्हणुन माझी अज्ञात चोरट्यांविरुध्द
तक्रार आहे.
माझी वरील फिर्याद मी वाचुन पाहिली ती माझे सांगणे प्रमाणे संगणकावर बरोबर टंकलिखीत
करण्यात आलेली आहे. या काही दिवसांपासून भेंडा व परिसरात चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. लवकरात लवकर या चोरी चा तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



