भेंडा ता.नेवासा येथील जबरी चोरीतील आरोपी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक- 23/06/2023
भेंडा ता.नेवासा येथील जबरी चोरीतील आरोपी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
सविस्तर माहिती- दिनांक १७/०६/२०२६ रोजी पहाटे ०२/३० वा. ते ०३/०० वा. चे दरम्यान
भेंडा खुर्द गावचे शिवारातील फिर्यादीचे नवलेवस्ती येथील बंद घराचे खिडकीचे गज काढुन अनोळखी इसमांनी
त्यांचे हातातील लोखंडी पाईप, कट्टा, कोयता, असे हत्यारे घेवुन आमचे घरात प्रवेश करुन फिर्यादीचे भाऊ यांना
मारहाण करुन बळजबरीने घरातील रोख रक्कम व सोन्याचे मोबाईल फोन चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु. र. नं. ५१२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे
कलम ३३१ (४), ३०५, ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
सपोनि / हरिष भोये, पोउपनि / संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब
नागरगोजे, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, महिला पोलीस अंमलदार
सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथके तयार करुन सदर पथकास आरोपीची माहिती काढुन
आरोपीस अटक करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक २१/०६/२०२६ रोजी नमुद पथक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना पथकास तांत्रिक
विश्लेषण व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने सदरचा गुन्हा हा इसम नामे विकी ज्ञानेश्वर पवार रा. ब्राम्हणगाव वेताळ
ता. श्रीरामपुर याने त्याचे साथीदासह केला असुन तो मुकिंदपुर (नेवासा फाटा) ता. नेवासा येथे नातेवाईकांकडे येणार
असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने मक्तापुर रोड मुकिंदपुर शिवारात सापळा रचुन थांबले
असता एक इसम संशयीतरित्या मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे
नांव १) विकी उर्फ विकास ज्ञानेश्वर पवार वय – ३२ वर्षे रा. ब्राम्हणगांव वेताळ ता. श्रीरामपुर असे असल्याचे
सांगितले त्यास नेवासा पोलीस स्टेशनचे वरील गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा
त्याचे साथीदार नामे २) राहुल बबन वाघमारे रा. रांजणगाव खुर्द ता. राहाता (फरार) अशांनी मिळुन केल्याची
कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपीस वर नमुद गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक
करण्यात आलेली असुन गुन्ह्याचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील वरील पोलीस अधिकारी यांनी केलेली आहे.



