संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा , दिनांक-18/06/2026
भेंडा खु येथील नवलेवस्ती येथे जबरी चोरीच्या उद्देशाने मारहाण करून चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा खु येथे जबरी चोरीच्या घटना घडली आहे. भेंडा खु येथील रहिवासी तसेच प्रगतिशील शेतकरी सोपानराव नवले यांच्या वस्तीवर चार जणांनी जबरी चोरी केली

तसेच घरातील व्यक्तींना मारहाण देखील केली आहे. याबाबत श्वेत संदीप नवले वय 20 वर्ष यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर होऊन फिर्याद दिली आहे.त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की
दि. १७/०६/२०२६ रोजी पहांटे ०२ / ३० वा. ते
दि. १७/०६/२०२६ रोजीचे पहाटे ०३ वाजता च्या
दरम्यान भेंडा खुर्द गावचे शिवारातील आमचे
नवले वस्ती येथील आमचे बंद असलेल्या राहते घराचे खिडकीचे लोखंडी गज काढून चार
अनोळखी चोरट्यांनी त्यांचे हातात लोखंडी
पाईप, कट्टा, कोयता, असे हत्यारे घेवुन
आमचे घरात घुसून बळजबरीने चोरी करण्याच्या
उद्देशाने प्रवेश करुन घरातील पैसे व सोन्याचे
दागिने याचा शोध घेत असताना मी
मोठमोठ्याने आरडाओरड केल्यामुळे त्यांनी
मला त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने मारहाण
करून जखमी केले आहे. तसेच माझा भाऊ
ऋषीकेश यास देखील घरामध्ये बांधुन ठेवुन
घरातील भाऊ ऋषीकेश याचा 15 हजार रुपये किंमतीचा नथिंग कंपनीचा मोबाईल फोन वरील वर्णनाचा
चोरट्यांनी चोरून नेला आहे. यामुळे चोरटे व आमच्या मध्ये काही वेळ झटापट झाली. त्यावेळी त्यांच्या कडे लोखंडी पाईप, कट्टा,कोयता, गज यांसारखे हत्यारे होती .त्यांनी आम्हाला जबरदस्त मारहाण करून पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. आम्ही केलेल्या आरडाओरडा चा आवाज ऐकून आमच्या शेजारी राहणारे धावत पळत आले. त्यानंतर सदर घटनेची माहिती नेवासा पोलीसांना कळवली असता त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. या सदर घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ अमोल डमाळे, सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगर येथील स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतू कोणत्याही प्रकारची पुरावा आढळुन आला नाही. श्वेत संदीप नवले यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 512/2026 भारतीय न्यायसहिंता कायदा 2023 चे कलम 331(4),305,309(6) कलमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून. पुन्हा एकदा भेंडा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे . चोरांचा बंदोबस्त करावा तसेच लवकरात लवकर योग्य तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.



