उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागापूर ता-नेवासा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे भव्य उद्घाटन

संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा दिनांक- 25/07/2025
सविस्तर माहिती- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, दिनांक 25 जुलै 2025 रोजी नेवासा तालुक्यातील नागापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी नेवासा तालुक्यातील व पक्षातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.उपक्रमाद्वारे नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गावोगावी
कार्यकर्त्यांचा थेट संपर्क वाढवण्याची, युवकांना
संघटनेत सहभागी करून घेण्याची आणि पक्ष
विचारांची नाळ पुन्हा जुळवण्याची दिशा स्पष्ट केली
आहे. . विविध स्तरांतील कार्यकर्त्यांनी,
महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी यास उत्स्फूत असा
प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम म्हणजे केवळ शुभारंभ
नव्हे, तर पक्षसंघटन बळकटी करणाची एक ठोस
कृती आहे, असे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त
होत आहे. सर्वप्रथम या उद्घाटनप्रसंगी नागापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रकरणी
तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे
मकरंदजी राजहंस
बाबासाहेबजी नवथर
विलासरावजी देशमुख
सतीशजी कावरे
वसंतराव कांगुणे
संदीपजी लष्करे
अशोकराव काळे
अर्जुन कापसे
अभिराज आरगडे
पत्रकार संतोष औताडे
विश्वजित देशमुख, तुषार काळे, ज्ञानदेव जावळे, राजू लवांडे तसेच शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवीन शाखेचे पदाधिकारी:
शाखाध्यक्ष: राहुल लवांडे
उपाध्यक्ष: बापू खरे
सचिव: भाऊसाहेब कापसे
सरचिटणीस: कृष्णा आढागळे
सदस्य: आनंद वडागळे, आदेश भारस्कर, सचिन आढागळे आदींचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.