गुन्हेगारी
Trending

संवत्सर ता . कोपरगाव येथे झालेला दरोड्यातील सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक- 17/ 09 / 2022


संवत्सर ता . कोपरगाव येथे झालेला दरोड्यातील सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

 


प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की , फिर्यादी सौ . कविता अनिल सोनवणे वय ५० रा . नऊचारी , संवत्सर , ता . कोपरगाव यांनी दिनांक १५ / ० ९ / २०२२ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी दिली की , दिनांक १५ / ० ९ / २०२२ रोजीचे रात्रीचे ००/४५ वा . चे सुमा . ०७ अनोळखी इसमांनी आमचे घराचा दरवाजा चौकटीमधुन गज घालुन गजाने व ताकदीने आत ढकलुन घरात प्रवेश करुन माझे पती ( १ ) अनिल हरीभाऊ सोनवणे वय ५४ , सासु ( २ ) सुगंधाबाई हरीभाऊ सोनवणे वय ७८ वर्ष , जाऊ ( ३ ) सुनिता बबन सोनवणे वय ५२ वर्षे सर्व रा . नऊचारी , संवत्सर , ता . कोपरगाव अशांना गजाने , चाकुने , लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन आमचे घरातील २,८१,५०० / – रु किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने काढून मोबाईल हिसकावून घेऊन आमचे घराचे दरवाजाला बाहेरुन कडी लावून पसार झाले आहेत सदरबाबत कोपरगाव शहर पो.स्टे . गुरनं २८७/२०२२ भादविक . ३ ९ ५,३ ९ ७ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा . श्री मनोज पाटील सो . पोलीस अधीक्षक , अहदमदनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री . अनिल कटके , सपोनि / गणेश इंगळे , सपोनि / दिनकर मुंडे , पोसई / सोपान गोरे , सफी / बाळासाहेब मुळीक , मनोहर शेजवळ , पोहेकॉ / सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , योगेश घोडके , मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , विश्वास बेरड , पोना / शंकर चौधरी , राहुल सोळुंके , संदीप चव्हाण दिलीप शिंदे , संदीप दरंदले , ज्ञानेश्वर शिंदे , पोकॉ / रणजित जाधव , रविंद्र घुंगासे , विजय धनेधर , मेघराज कोल्हे , चापोहेकॉ / संभाजी कोतकर , बबन बेरड , अर्जुन बडे , चापोकाँ / भरत बुधवंत अशांनी वारी , सावळीविहीर , रुई गावाचे शिवारात , ता . कोपरगाव संशयीत आरोपींची माहिती घेत असतांना श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा आरोपी नामे दिलीप विकास भोसले रा . कारवाडी शिवार , कोकमठाण , ता . कोपरगाव याने त्याचे साथीदारांसह केला आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी वरील पथकासह आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून कारवाडी शिवार , कोकमठाण , ता . ‘ कोपरगाव येथे सापळा लावला . आरोपी मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच काही इसम पळून जाऊ लागले त्यावेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफीने कारवाडी शिवारातून इसम नामे ( १ ) दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा . काटवाडी , कोकमठाण , ता कोपरगाव ( २ ) अनिल अरुण बोबडे रा . वेस , ता . राहाता ( ३ ) राहुल दामू भोसले रा जेऊर पाटोदा , ता . कोपरगाव अशांना ताब्यात घेतले . त्यांचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार यांची नावे सांगितली आहे.सदरची कारवाई बी जी शेखर विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली मा मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर,  पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम श्रीरामपूर, संजय सातव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे