ब्रेकिंग
Trending

नेवासा पोलीस ठाण्याच्या नुतन ईमारतीला मुहूर्त “नेवासा पोलीस ठाण्याच्या नवीन ईमारतीस मंजुरी”

संतोष औताडे-मुख्य संपादक,नेवासा                  दिनांक- 14/01/2025


*नेवासा पोलीस ठाण्याच्या नुतन ईमारतीला मुहूर्त “नेवासा पोलीस ठाण्याच्या नवीन ईमारतीस मंजुरी”*

सविस्तर माहिती-*”नेवासा पोलीस ठाण्याला मिळणार नवीन ईमारत”*”नेवासकरांना मिळणार नवीन पोलीस ठाणे”*

पोलीस ठाणे नेवासाची सध्याची ईमारत अंदाजे 1936 सालाची जुनी आहे. मागील काळात सातत्याने वाढती गुन्हेगारी व नियुक्त असलेले मनुष्यबळ यांना बसण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याची ईमारत अत्यंत तोकडी आहे हे विचारात घेऊन नेवासा पोलीस ठाण्याला नवीन ईमारत व पोलिसांना शासकीय निवासस्थाने असावी म्हणून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी राज्याच्या गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास अनुसरून नवीन पोलीस ठाणे व पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या 40 निवासस्थानांसाठी मंजुरी मिळाली होती. मंजुरीस अनुसरून पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण महामंडळ यांनी ई-टेंडर्स काढले होते. सदरचे ई-टेंडर्स मंजूर झाले असून पोलीस ठाणे ईमारतीचे बांधकाम पालसिद्ध कन्स्ट्रक्शन, मेहकर, बुलढाणा या बांधकाम कंपनीस मिळाले आहे तर देखरेख ध्रुवतारा कन्स्ट्रक्शन अहिल्यानगर हे करणार आहेत.
नेवासा पोलीस ठाण्याची नवीन ईमारत ज्ञानोदय इंग्लिश मेडियम स्कूलसमोरील जुना फौजदार बंगला येथील पोलीस विभागाच्या 22 गुंठे जागेमध्ये आणि नविन चार मजली निवासस्थाने सध्या अस्तित्व असलेल्या जुन्या निवासस्थानांच्या जागेमध्येच होणार आहेत. या साठीचा अंदाजीत खर्च 10 कोटी रूपये एवढा येणार आहे. पोलीस ठाणे ईमारत व निवासस्थानाचे कामकाज 18 महिन्यात पूर्ण करायचे आहे. नेवासा पोलीस ठाण्याच्या नवीन ईमारतीचे भूमिपूजन पुढील काही दिवसातच पार पडेल.

नेवासा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव मागील वर्षी हजर झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या नवीन ईमारतीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते, त्यास यश मिळाले आहे.

नेवासा तालुक्यातील 94 गावाचा गावाची कायदा व सुव्यवस्था याच जुन्या ईमारतीतून अद्याप पर्यंत राखली जात आहे. नेवासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुकाणा व प्रवरा संगम या ठिकाणी दूरक्षेत्र आहेत, तर 5 बीट आहेत. पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले 6 अधिकारी व 65 अंमलदार यांना बसण्यास अत्यंत अपुरी तोकडी जागा होती. अधिकारी अंमलदार दाटीवाटीने बसून कामकाज करीत आहेत. नागरिकांना देखील पोलीस ठाण्यात आल्यानंतर बसण्यास जागा नसल्याने अनेकदा पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर व इतरत्र उभे राहून वाट पहावी लागते.

नवीन ईमारतीत सुसज्ज असा ठाणे अंमलदार कक्ष असेल, प्रभारी अधिकाऱ्यांचा कक्ष स्वतंत्र असेल, गुन्हे अभिलेख तसेच गोपनीय शाखा, पासपोर्ट, चरित्र पडताळणी विभाग, बिनतारी संदेश यंत्रणा, सीसीटीएनएस, अँम्बिस यंत्रणा यासाठी देखील स्वतंत्र कक्ष असतील. दुय्यम अधिकाऱ्यांना बसण्यास स्वतंत्र कक्ष असतील. गुन्हे तपास पथक यांचे करीता आरोपींना विचारपूस करण्यासाठी देखील स्वतंत्र कक्ष असेल. महिला व मुलांसाठी वेगळा कक्ष स्थापन करता येऊ शकेल. माहिती व तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत्या परिस्थितीनुसार नवनवीन तपास, संपर्क यंत्रणा प्रस्थापित करता येतील.

गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल हा सुरक्षित ठेवावा लागतो. परंतु मुद्देमाल ठेवण्यास देखील पुरेशी व सुरक्षित जागा नाही. तपासात जप्त केलेली वाहने उभी करण्यास देखील जागा नाही. पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना आपली वाहने लावण्यास पुरेशी जागा नाही. पोलिसांच्या साप्ताहिक परेडसाठी जागा उपलब्ध होईल. अशा सर्व समस्या नवीन ईमारत झाल्यानंतर सुटणार आहेत.

नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या कुटुंबीयांना देखील राहण्यासाठी सुरक्षित, पुरेशा निवासस्थानांची आवश्यकता असते. सध्या प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार हे वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर रहात आहेत.

नेवासा पोलीस ठाण्याला सुसज्ज अशी नवीन ईमारत झाल्यानंतर गुन्हेगारी रोखुन, नागरिकांना जलद, तत्पर आणि चांगल्या दर्जाची सेवा निश्चितपणे देता येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक, धनंजय जाधव यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे