गुन्हेगारी
Trending

नेवासा तालुक्यात शेळ्या व बोकडे चोरणाऱ्या चोरांना नेवासा पोलिसांनी केले जेरबंद

संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा.                दिनांक- 17/12/2024


नेवासा तालुक्यात शेळ्या आणि बोकडे चोरणारी टोळी जेरबंद*

मागील काही दिवसांपासून नेवासा तालुक्यात शेळ्या व बोकडे चोरणाऱ्या चोरांना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मागील काही दिवसांपासून नेवासा तालुक्यात शेळ्या व बोकडे चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला होता. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाणे नेवासा येथे तक्रारी दाखल केल्या आहेत.
दिनांक 5 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास निपाणी निमगाव येथील आवेश एकनाथ चव्हाण यांच्या राहत्या घरासमोरील 25 हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या व एक बोकड चोरून नेले होते. या बाबत आवेश चव्हाण यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने निपाणी निमगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक संशयास्पद मारुती स्विफ्ट कार मध्यरात्री फिरत असल्याचे दिसून आली. नेवासा पोलिसांनी सदर स्विफ्ट कारचा माग काढला असता तो पाचेगाव पर्यंत गेला. पाचेगाव परिसरातील कारबाबत पोलिसांनी गोपनीय माहिती काढली असता 1.विजय मच्छिंद्र माळी 2.दिलीप द्वारकानाथ माळी 3.संतोष सुभाष माळी 4.सोमनाथ रावसाहेब माळी व 5. बापू विनायक माळी यांची टोळी असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी या प्रकारची कार या लोकांकडे आहे अशी खत्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर नेवासा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. काल रात्री नेवासा पोलिसांनी छापा टाकून आरोपींना मारुती शिफ्ट कारसह सीताफिने पकडले. त्यानंतर या आरोपींकडे बारकाईने विचारपूस केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यापूर्वी नेवासा तालुक्यात अनेक शेळ्या व बोकडे चोऱ्या झालेल्या आहेत. याबाबत पोलीस अधिक सखोल तपास करणार आहेत.
आरोपींना आज मा. न्यायालया समोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींची गुरुवार दि. 19 डिसेंबर रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
सदरची कारवाई मा. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. वैभव कल्लूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, व मा. सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार केदार, पोलीस नाईक माने, पोलीस कॉन्स्टेबल राम वैद्य, अमोल कर्डिले, नारायण डमाळे, बाळासाहेब भवर, गीता पवार यांनी केली आहे.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे