आदर्श आचारसंहिता दरम्यान ओपीनीयन पोल, किंवा जाहिरात करण्यास बंदी. जिल्हाधिकारी यांचा आदेश
संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा. दिनांक- 17/11/2024
सविस्तर माहिती- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
आदर्श आचार संहिते दरम्यान ओपिनियन पोल व राजकीय जाहिराती प्रतिबंधित
केलेबाबत जिल्हाधिकारी साहेब यांनी पञ काढले आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. अहिल्यानगर
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्या
अनुषंगाने दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी
सायंकाळी 6.30 वाजे पर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, किंवा कोणत्याही
माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन
पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही
निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. या नियमांचे पालन होईल याची दक्षता एअरटेल ,जीओ , आयडिया तसेच इतर मोबाईल कंपन्यांनी दक्षता
घ्यावी. तसेच पूर्व प्रमाणीकरण केलेल्या राजकीय जाहिराती देखील 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंतच
देता येतील. पूर्व प्रमाणिकरण नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राजकीय जाहिरातींचे एसएमएस, व्हॉईस कॉल
पाठवले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पूर्व प्रमाणिकरण न केलेल्या जाहिराती मोबाईलवर पाठवल्या जात
असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे पञ माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात मार्फत काढण्यात आले आहे. सदर आदेशाचे पालन केले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील यात सांगितले आहे.