ब्रेकिंग
Trending

नेवासा तालुक्यातील वाकडी येथे मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात विहीरीमधे बुडून पाच जणांचा मृत्यू.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक -08/04/2024

 

 


सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील वाकडी येथील गावात विहिरीमधे पडलेल्या मांजर काढण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल घडली असून.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाकडी येथील अनिल बापूराव काळे
यांच्या घराजवळ वापरत नसलेली
50 फूट खोलीची जुनी विहीर आहे. या
विहिरीत गाईंच्या गोठ्यातील शेण-मूत्र
सोडले जाते. काल मंगळवार दिनांक 9
एप्रिल रोजी 5 वाजण्याच्या सुमारास पाडव्याच्या दिवशीच विहिरीमध्ये मांजर पडले
असता त्या मांजरीला काढण्यासाठी
विशाल अनिल काळे (वय 28
वर्षे) हा विहिरीमध्ये उतरला असता
विहिरीतील शेण-मूत्र मिश्रित पाण्यामध्ये
बुडू लागल्याने त्याचे वडील अनिल बापूराव
काळे (वय 55 वर्षे) हे विहिरीत उडी मारली दोघे ही
बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी
माणिक गोविंद काळे (वय 65 वर्षे) हे
विहिरीत उतरले, त्यांनतर संदीप माणिक
काळे (वय 32 वर्षे) बाबासाहेब गायकवाड (वय 40)

Oplus_0

असे एकापाठोपाठ पाचजण विरहित उतरले होते. विजय माणिक काळे यांना उपचारासाठी नेवासा नंतर अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते.या विहिरीत शेण /मूत्र मिश्रित पाणी तसेच गाळ असल्याने गाळात अडकून पडले व येथेच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला

आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिस स्टेशन चे कर्मचारी तसेच तहसील, व आरोग्य विभाग घटना स्थळी दाखल झाले होते. त्याच बरोबर अहमदनगर, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, शिर्डी येथील महानगरपालिका कर्मचारी व रेस्कुटीम , फायर ब्रिगेड,अॅंबुलन्स, घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ , पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलकुमेऀ, पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटीलसाहेब, तहसील संजय बिराजदार, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब, अहमदनगर महानगरपालिकेचे मिसाळ साहेब ,संतोष औताडे (पञकार/आपदा मिञ), विठ्ठलराव लंघे, अंकुश काळे, खासदार सदाशिव लोखंडे तसेच विविध रेस्कुटीमचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. शर्थीचे प्रयत्न करत राञी 1 वाजण्याच्या सुमारास सर्व मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे