ब्रेकिंग
Trending

भेंडा येथे अवैध गोमांस वाहतूक करणारा आयशर पकडला.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा      दिनांक – 03/04/2824


*भेंडा येथे गोमांस वाहतूक करणारा आयशर पकडला* सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील भेंडा येथे गोमांस वाहतूक करणारा आयशर ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. सदर घटनेची माहिती अशी की दि. 02/04/2024 रोजी कुकाणा
दुरक्षेञ येथे डायल 112 वर कॉल आला होता. गोमांस वाहतूक करणारा ट्रक भेंड्यात येत आहे सदर घटनेची माहिती मिळताच
पोसई/ढाकणे सो. पोहेकाँ/35 घुगे,
पोना/2127खेडकर,पोना/833 पवार, पोकाँ/697 साळवे भेंडा बुद्रुक येथील इंडियल ऑईल पेट्रोलपंपच्या जवळ दाखल झाले त्याठिकाणी गोमांस वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH04 EB 9949 हा जप्त करण्यात आला असून.
पोसई/ढाकणे सो. यांनी लागलीच दोन पंचांना बोलावुन त्यांना बातमीतील हकीगत समजावुन सांगितल्याने व
पंचांने होकार दिल्याने आम्ही वरील स्टाफ व पंच असे खाजगी वाहनाने 17.10 वा.चे सुमारास कुकाणा दुरक्षेत्र
येथुन निघुन बातमीतील नमुद ठिकाणी 17.30 वा. असता आयशर टेंम्पो नं. एम. एच. 04 ई.बी. 9949 ही
उभी होती त्यावेळी आयशर टेंम्पो मध्ये बसलेल्या इसमास पोसई/ढाकणे सो.यांनी पोलीस स्टाफ व पंचांची ओळख
सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आलीम आजीज सय्यद वय 40 वर्ष,
रा.मोमीनपुरा, मासुम कॉलनी, जि. बीड असे असल्याचे सांगितले. त्यावेळी पंचांसमक्ष आयशर टेम्पोची पाहणी
केली असता आयशर गाडीमध्ये गोवंश कत्तल जनावरांचे हाडे असल्याचा लक्षात आले.त्याचे वर्णन
खालीलप्रमाणे

0000/-रु.किं.चे अंदाजे 4000 किलो वजनाचे गोवंश कत्तल जनावरांचे हाडे किं.अं.
8,00,000/-रु.किं.ची एक आयशर कंपनीची गाडी क्र. एम.एच. 04 ई.बी. 9949
जु.वा.किं.अं.
8,00,000/-रु.एकुण
येणेप्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जनावरांचे हाडे व आयशर गाडी मिळुन आल्याने
पोसई/ ढाकणे सो.यांनी दोन पंचासमक्ष जप्त केले. त्यानंतर सदर हाडे हे गोवंशीय आहेत अगर कसे याची
पडताळणी करणे पशुवैद्यकीय अधिकारी, नेवासा खु।। ता. नेवासा यांना सदर माहिती देवुन सदर हाडे ही
गोवंशीय आहे अगर कसे ? याचे परीक्षण होणे. करिता राखुन ठेवले.
तरी दि.02/04/2024 रोजी सायंकाळी 17.30 वा. चे सुमारास इसम नामे अलीम अजीज सय्यद वय 40
वर्ष, रा.मोमीनपुरा,मासुम कॉलनी, जि. बीड हा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करणेची मनाई
असताना त्यांना निर्दयतेने वागणुक देवुन त्यांची कत्तल केलेली हाडे विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जात
असतांना मिळुन आला आहे. म्हणुन इसम नामे आलीम आजीज सय्यद रा. मोमीनपुरा, मासुम
कॉलनी,जि.बीड याचे विरुध्द भा.दं.वि. कलम 429 सह, महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे
सुधारित सन 2015 चे कलम 5 (अ), 5 (ब), 119 प्रमाणे कायदेशीर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नेवासा पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे