कर्जत परिसरात घरफोडी करणारे 2 आरोपी जेरबंद, 3 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
संतोष औताडे- मुख्य संपादक , नेवासा. दिनांक:- 27/04/2024
———————————————————-
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी अनोळखी इसमांनी फिर्यादी श्री. राघु पांढरु लकडे वय 45, रा. जलालपुर शिवार, ता. कर्जत यांचे बंद घराची कडी उघडुन, आत प्रवेश करुन पत्र्याचे पेटीतील 2,57,000/- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले बाबत कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 251/2024 भादविक 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउनि/सोपान गोरे अंमलदार रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, फुनकान शेख, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ व अरुण मोरे अशांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
स्थागुशा पथक दिनांक 26/04/24 रोजी कर्जत परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास वरील प्रमाणे दाखल गुन्हा हा आरोपी नामे कोहिनूर ऊर्फ सोल्जर जवान काळे रा. शेडगांव फाटा, ता. श्रीगोंदा याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो जलालपुर, ता. कर्जत बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच जलालपुर, ता. कर्जत बस स्टॅण्ड रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे 1 इसम संशयीतरित्या येताना पथकास दिसला. त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) कोहिनुर ऊर्फ सोल्जर जवान काळे वय 22, रा. शेडगांव फाटा, ता. श्रीगोंदा असे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत 10,000/- रुपये रोख रक्कम मिळुन आली. सदर रोख रकमे बाबत विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे जग्गु भोसले (फरार) रा. खोरवडी, ता. दौंड, जिल्हा पुणे असे दोघांनी मिळुन तळवडी, ता. कर्जत येथील एका घरातुन चोरी केलेली रोख रक्कम असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे अधिक विचारपुस करता त्याने काही दिवसांपुर्वी जलालपुर, ता. कर्जत येथील बंद घरातुन व राशिन, ता. कर्जत येथुन चोरी करुन चोरीचे दागिने इसम नामे अशोक भोसले रा. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. हिरडगांव फाटा, ता. श्रीगोंदा यास विक्री केल्याचे सांगितले. पथकाने लागलीच आरोपीचे साथीदाराचा शोध घेता आरोपी नामे 2) अशोक बबन भोसले रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. हिरडगांव फाटा, ता. श्रीगोंदा हा हिरगांव फाटा येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.
आरोपी अशोक भोसले यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सोन्याचे दागिन्याबाबत विचारपुस करता त्याने 1,08,000/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 30 भाराचे चांदीचे दागिने काढुन दिल्याने ते जप्त करण्यात आलेले आहे.
आरोपीने सांगितलेल्या हकिगती प्रमाणे स्थागुशा पथकाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे -3 गुन्हे उघडकिस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कर्जत गु.र.नं. 77/24 भादविक 457, 380
2. कर्जत गु.र.नं. 251/24 भादविक 457, 380
3. कर्जत गु.र.नं. 291/24 भादविक 457, 380
ताब्यातील दोन्ही आरोपींचे कब्जात 1,18,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.