नेवासा परिसरात मंदीर चोरी व शेवगांव येथील घरफोडी करणारा आरोपी 3,17,500/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद 2 गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक:- 30/03/2024
—————————————————
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 21/03/24 रोजी फिर्यादी श्री. चंद्रकांत भानुदास मुंगसे वय 49, रा. देडगांव, ता. नेवासा यांचे गांवातील विविध मंदीरातील दानपेट्या फोडुन 21,000/- रुपये रोख रक्कम अनोळखी इसमांनी चोरुन नेले बाबत नेवासा पो.स्टे.गु.र.नं. 280/2024 भादविक 379, 34 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
मंदीर चोरीची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल व अंमलदार रविंद्र कर्डींले, अतुल लोटके, संदीप दरंदले, फुरकान शेख, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, रविंद्र घुगांसे व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने घटना ठिकाण व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे आरोपींचे वर्णन व गुन्हा करण्याची पध्दतीचा अभ्यास करुन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पथकास वर नमुद गुन्हा संशयीत इसम नामे नामदेव आव्हाड रा. घनसांवगी, जिल्हा जालना याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने संशयीताचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) नामदेव लक्ष्मण आव्हाड वय 25, रा. घुंन्शी, ता. घनसांवगी, जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे 2) सतिष माणिक काळे (फरार), 3) हिरा माणिक काळे दोन्ही रा. घनसांवगी, जिल्हा जालना (फरार), 4) विजय अशोक चव्हाण रा. बालाजी देवगाव, ता. नेवासा (फरार) व 5) रामा (विजय चव्हाण याचा नातेवाईक) (फरार) पुर्ण नाव माहित नाही. यांचे सोबत मिळुन ताब्यातील स्विफ्टगाडीत येवुन गुन्हा केल्याचे सांगितले.
आरोपीस अधिक विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे गुन्हे केले या बाबत विचारपुस करता आरोपीने सर्वांनी मिळुन काही दिवसांपुर्वी शेवगांव ते बोधेगांव जाणारे रोडवरील बंद घर फोडुन घरातील रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता शेवगांव पो.स्टे.गु.र.नं. 219/2024 भादविक 454, 380 प्रमाणे दाखल गुन्हा उघडकिस आला आहे.
//2//
आरोपीची अंगझडती घेता त्याचे अंगझडतील मिळुन आलेल्या रोख रकमेबाबत विचारपुस करता आरोपीने मंदीर चोरीचे गुन्ह्यातील 2,500/- रुपये रोख व घरफोडीच्या गुन्ह्यातील 15,000/- रुपये रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने आरोपीस दोन्ही गुन्ह्यातील 17,500/- रुपये रोख व गुन्हा करताना वापरलेली 3,00,000/- रुपये किंमतीची स्विफ्ट कार असा एकुण 3,17,500/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन नेवासा पो.स्टे.गु.र.नं. 280/2024 भादविक 379, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासात हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.