संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -29/03/2024
सविस्तर माहिती – आगामी काळात निवडणूक प्रक्रिया
शांततेत व निर्भयी वातावरणामध्ये पार
पाडण्यासाठी सीमा सुरक्षा दल व पोलीसदल यांच्या
संयुक्त विद्यमाने रूटमार्च चे आयोजन करण्यात आले होते. जनसामान्यांमध्ये विश्वास
निर्माण करणे व गुन्हेगारांवर वचक निर्माण
करणे यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या
हद्दीमध्ये नेवासा शहर व कुकाणा येथे
शुक्रवार दि. 29 मार्च रोजी रूट मार्च चे आयोजन करण्यात आले. आगामी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024
व आगामी सण उत्सव अनुषंगाने कुकाणा
शहर, नेवासा फाटा, नेवासा शहर या
ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त
वातावरणात व शांततेत पार पाडणे दृष्टीने
सीमा सुरक्षा बल व पोलीस असा संयुक्त
रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च करीता सीमा सुरक्षा दलाचे
कंपनी कमांडर श्री. अखिलेश कुमार गुप्ता
यांचे सह 32 जवान, पोलीस ठाणे नेवासा
कडील 6 अधिकारी, 25 अमलदार, 10
होमगार्ड असे सहभागी झाले होते.नेवासा तालुक्यातील रूट मार्च
सकाळी 9.00 वाजता नेवासा फाटा येथे
आगमन, 9.30
वाजता कुकाणा येथे
आगमन,9.30 ते 10.30 कुकाणा गावामध्ये
रूट मार्च, 11.00 वाजता नेवासा येथे
आगमन, सकाळी 11.00 ते दुपारी 12.00
वाजता नेवासा गावामध्ये रूट मार्च, दुपारी
12.30 वाजता पाकशाळा येथे जवानांचे
दुपारचे जेवण.
दुपारी 13.30 वाजता अहमदनगरकडे
रवाना. झाले.
.सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा
ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक
परिणाम दिसून आला.
सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य
नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना
व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर
नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश
ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव
कल्लुबर्मे, श्रीरामपूर ,व शेवगाव येथील उप विभागीय पोलीस
अधिकारी सुनील पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांनी आयोजित केला होता.