मंगळसुत्र चोरीतील सराईत महिला आरोपीची टोळी जेरबंद, एकुण १७, ७७,५००/- रु.किं. चा मुद्देमाल जप्त. श्रीरामपुर शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा :- दिनांक 17/12/2023
मंगळसुत्र चोरीतील सराईत महिला आरोपीची टोळी जेरबंद, एकुण १७, ७७,५००/- रु.किं. चा
मुद्देमाल जप्त. श्रीरामपुर शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
दिनांक 22/11/2023 रोजी सकाळी 10/30 वा.चे सुमारास फिर्यादी धनश्री हंबीरराव सरनौबत, वय 42 वर्षे, धंदा-
नोकरी, प्रोफेसर रा. महात्मा फुले कृषी विदयापीठ राहुरी या खोकर येथे राहत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीस भेटण्यासाठी राहुरी
येथुन खोकर ता. श्रीरामपूर या ठिकाणी आल्या होत्या, त्या मैत्रीनीला भेटुन खोकर येथुन निघुन राहुरी येथे जाण्यासाठी दुपारी
02/30 वा. चे सुमारास श्रीरामपूर बस स्टॅण्डवर आल्या व बसची वाट बघत स्टॅण्डवर उभ्या असताना श्रीरामपूर पुणे बस आल्याने
त्या बसमध्ये वरती चढत असताना बसच्या दरवाज्यात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या
गळ्यातील 45,000/- रु.किं.चे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरले वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस
स्टेशन गुरनं.1216/2023 भादंवि कलम 379, 34 प्रमाणे दिनांक 22/11/2023 रोजी दाखल करण्यात आला आहे.
तसेच अशाच प्रकारचे गुन्हे श्रीरामपूर बस स्टॅण्ड येथे घडलेले असल्याने मा. पोनि. हर्षवर्धन गवळी सो. यांनी तात्काळ
तपास पथकास सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे तात्काळ घटनास्थळी जावुन तांत्रिक
विश्लेषणकरुन तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेवुन गुन्हयातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेत
असतांना तपास पथकास सदरच्या गुन्हयामध्ये एक महिंद्रा स्कॉपीओ गाडी तिचा नंबर एम.एच. 12, जी. एफ. 5637 या गाडीचा
वापर झाल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. सदर आरोपीचा व वाहनाचा शोध घेत असतांना दिनांक 09/12/2023 रोजी
सकाळी 11/00 वा. सुमारास सदर गुन्हयात वापरण्यात आलेली महिंद्रा स्कॉपीओ गाडी व त्यामध्ये येवुन श्रीरामपूर बस स्टॅण्ड
येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरी करणारी टोळी ही श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने
पोलीस पथकांने तात्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी लावली व नेवासाकडुन श्रीरामपूरकडे येणाच्या संशयीत वाहनाची
तपासणी करीत असताना दुपारी 12/05 वा. सुमारास पाढंया रंगाची महिंद्रा स्कॉपीओ गाडी तिचा नंबर एम. एच. 12,
जी.एफ.5637 असा असलेले वाहन नेवासाकडुन श्रीरामपूरकडे येताना दिसले तेव्हा सदर वाहनास पोलीस पथकाने हाताने
इशारा करुन तसेच आवाज देवुन वाहन थांबवण्यास सांगितले असता सदर वाहन चालकाने भरधाव वेगात पोलीस पथकास
हुलकावणी दिली व वाहन न थाबंवता तसाच श्रीरामपूरच्या दिशेने निघाले असता पोलीस पथकाने त्याचा शिताफीने पाठलाग
करुन सदर बाहनास केसरीनंदन बॅग हाऊस दुकानासमोर, श्रीरामपूर येथे पकडले व सदर वाहनातील महिला व इसमास पोलीस
स्टेशन येथे आणुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याची नावे 1)आसराबाई उर्फ लक्ष्मी ऊर्फ आशाबाई
तुकाराम पवार, वय 55 वर्षे, रा. बार्शी नाका, जि. बीड 2) सुनिता योगेश जाधव, वय 25 वर्षे, गांधीनगर, नाळवंडी नाका,
मोहटा देवी मंदिराजवळ, ता. जि. बीड. 3) वसंत विश्वानाथ मुंजाळ, वय 38 वर्षे, धंदा- मॅकॅनिक, एस. टी. डेपो बीड,
रा. हिरापूर ता. गेवराई जि. बीड सध्या एस.टी. कॉलनी बीड. 4) जुबेर रज्जाक पठाण, वय 29 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा.
मुन्नावर मस्जिद, तेलगाव नाका, ता. जि. बीड. 5) कैशल्या सर्जेराव गायकवाड, वय 52 वर्षे, रा. नाळवंडी नाका
जि. बीड. 6)
कमल विठ्ठल जाधव वय 53 वर्षे, रा. नाळवंडी नाका, खडी मशीनजवळ बीड. 7) सखुबाई सखाराम
कुन्हऱ्हाडे, वय 40, रा. माऊलीनगर गेवराई जि. बीड. 8) गवळण पांडुरंग गायकवाड, वय 35 वर्षे रा.उकंडा ता. पाटोदा
जि.बीड.9) शालनबाई लक्ष्मण जाधव, वय 55 वर्षे, रा. नाळवंडी जि.बीड.असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे नमुद
गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्यानी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्याना नमुद गुन्हयात अटक
करण्यात आली.
अटक कालावधीत आरोपीजवळ श्रीरामपूर एस.टी.
बस स्टॅण्ड तसेच इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवुन महिलेच्या
गळयातील सोन्याचे दागिणे चोरलेल्या मुद्देमालाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच
शेवगाव पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे दाखल गुन्हयाची कबुली दिल्याने त्याच्याकडुन गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात
आला असुन खालील नमुद गुन्हे उघड करण्यात आले आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर
तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा.
पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील पोसई/ समाधान सोळंके,
पोना/ रघुवीर कारखेले, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ गणेश गावडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/
संभाजी खरात, पोकॉ/ आकाश वाघमारे, मपोहेकॉ/लाव्हरे, मपोकॉ/ पुनम मुनतोडे, मपोकॉ/ अर्चना बर्डे, मपोकॉ/ मिरा सरग,
मपोकॉ/ योगीता निकम, मपोकॉ/ पुनम बागुल, मपोकॉ/ रुपाली लोहाळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलयाचे
पोना/संतोष दरेकर, पोकॉ/ आकाश भैरट यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन
गवळी सारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, हे करीत आहेत.
पोलीसांनतर्फे नागरिकांना आवाहन
सदर गुन्हयातील आरोपी हे बस स्टॅण्ड, यात्रा, सभेचे ठिकाण, धार्मीक कार्यक्रम इत्यादी गर्दीच्या ठिकाणी जावुन
ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये किंमती वस्तु आहेत किंवा त्याच्या बॅग मध्ये, खिश्यामध्ये किंमती वस्तु असण्याची शक्यता
आहे अशा व्यक्ती जवळ गर्दी करुन त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करुन त्याच्या कडील किंमती वस्तु काढुन घेवुन निघुन
जातात. अशी गुन्हा करण्याची पध्दत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या अवतीभोवती काही कारण नसता
कोणी गर्दीतर करत नाहीना याकडे लक्ष देणे तसेच गर्दीच्या ठिकाणी आपल्या किंमती वस्तुकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.