गुन्हेगारी
Trending

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यक्ष.

 संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा.        दिनांक :-11/08/2023

——————————————
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, संतोष लोढे, सचिन आडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/आकाश काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, अशोक गुंजाळ, प्रशांत राठोड व चापोना/भरत बुधवंत अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्याने. पथक अहमदनगर शहर परिसरात फिरुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना दि.10/08/23 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शेंडी ते मनमाड जाणारे बायपास रोडवर, हॉटेल किनाराचे पुढे अंधारात काही लोक राजस्थान व हरीयाणा पासींगच्या दोन ट्रकमधुन येवुन गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत दबा धरुन बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथकास रवाना केले.
पथकाने दि.10/08/23 रोजी 21.00 वाचे सुमारास शेंडी ते मनमाड जाणारे बायपास रोडवर, हॉटेल किनारा जवळ जावुन ताब्यातील वाहने बाजुस आडोशाला अंधारात उभी करुन, आजु बाजूस पहाणी करता हॉटेल किनाराचे पुढे दोन ट्रक रस्त्याचे कडेला लावुन, काही संशयीत इसम अंधारात दबा धरुन बसलेले पथकास दिसले. पथकाची खात्री होताच पथक संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असताना दोन इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यावेळी अंधारात दबा धरुन बसलेल्या इसमांना पथकाने शिताफीने ताब्यात घेवुन सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारता संशयीतांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अरशद हसन खान वय 37, रा. अलवर, शिवाजीपार्क, राज्य राजस्थान, 2) मोबीन जगमाल खान वय 43, 3) अहमद उस्मान खान वय 38, 4) खलीलमहंमद इसराईल खान वय 35, 5) सुनिल रामअवतार कुमार वय 24, 6) खुर्शिद मंगल खान वय 45, 7) मोहमंद आरिफ जोरमल वय 28 सर्व रा. बुबल्हेरी, मेवात, राज्य हरीयाणा 8) हासिम बसरु खान वय 25, 9) अलीम करीउद्दीन खान वय 25, दोन्ही रा. गनौर नगिना, नुह, राज्य हरीयाणा 10) ताजमहंमद रहेमान वय 45, रा. आखेडा, नुह, राज्य राजस्थान, 11) रईस इसाक खान वय 45, रा. लोहिंगा, पिपरवली, राज्य हरीयाणा असे असल्याचे सांगितले. त्यांना पळुन गेलेल्या इसमांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे 12) मोहमंद अफजल जोरमल रा. नुह, राज्य हरीयाणा (फरार) व 13) तय्यब मंगलखान रा. बुबल्हेरी, नुह, राज्य हरीयाणा (फरार) असे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक तलवार, तीन सुरे, कटर, फायटर, स्क्रु ड्रायव्हर, लाकडी दांडके, गलोल, मिरचीपुड, तीन विविध कंपनीचे मोबाईल फोन तसेच टाटा व आयशर कंपनीचे दोन ट्रक असा एकुण 35,62,900/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. नमुद मुद्देमालाबाबत विचारपुस करता आरोपींनी कोठे तरी दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आल्याची कबुली दिल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. 737/23 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपींचे पळुन गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे