ब्रेकिंग
Trending

पाचोरा येथील पत्रकारांवर झालेल्या हल्याचा नेवासा तालुका पत्रकार संघाकडून निषेध

 

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा- दिनांक -11/08/2023

सविस्तर माहिती –
जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भाड्य हल्याचा व त्यांना झालेल्या मारहाणीचा नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक शिवाजीरावं डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले

निवेदन देते वेळी एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामान्य माणसाला प्रशासाकिय पातळीवर कुठलाही न्याय न मिळाल्याने तो न्याय पत्रकाराच्या लेखणीतून मिळेल असा विश्वास आहे आणि अश्या पत्रकारांवर हल्ले होणे हि लाजिरवाणी गोष्ट आहे

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की पत्रकार संदीप महाजन यांना काही दृष्ट प्रवृत्ती च्या व्यक्तींनी मारहाण केली या घटनेचा नेवासा तालुका एकता पत्रकार संघ तीव्र निषेध केला संबंधित हल्लेखोराना त्वरित अटक करून त्याच्यावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याने गुन्हा दाखल व्हावा तसेच महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले होत आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठी वाढ झाली आहे ही चिंतेची बाब आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी असे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर एकताचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित, जेष्ठ पत्रकार गुरू प्रसाद देशपांडे ,राजेंद्र वाघमारे, प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड , अनिल गर्जे, कारभारी गरड, इकबाल शेख, सुहास पठाडे, शंकर नाबदे, मकरंद देशपांडे, रमेश शिंदे, सतिष उदावंत पवन गरुड, अशोक पेहकरक, बाळासाहेब पंडित, संतोष औताडे, विजय खंडागळे आदींच्या सह्या आहेत.

चोकट– *नेवासा तालुक्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहे तालुक्यातील पत्रकाराचे शिष्टमंडळ घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटून पत्रकारांवर हल्ला झाल्यास पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानवे गुन्हा दाखल करावा* असे निवेदन देण्यात आले असुन सर्व पञकार संघटना यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे