संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा ,दिनांक 09/08/2023
शेतकरी आत्महत्यांचा कंलक पुसण्यासाठी अबकी बार किसान सरकार
सविस्तर माहिती – देशातील शेतकरी आत्महत्यांचा कलंंक पुसण्यासाठी श्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली भारतात अबकी बार किसान सरकार आणण्याचा निर्धार राज्यातील शेतकऱ्यांनी इस्लामपूर येथे आयोजित सन्मान सोहळ्यात केला .
भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगानाचे मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांनी नव्याने तयार झालेल्या तेलंगाना राज्यात तेलंगाना मॉडेल राबवुन तेथील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार ,शेतीला चोवीस तास वीजपुरवठा व पिकांना पाणी उपलब्ध करुन देऊन सात हजार खरेदी केंद्रावर शेतमालाची हमी भावाने खरेदी करून त्यांना चोवीस तासात पैसै दिले . यामुळे कधी काळी देशात शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या तेलंगानातील शेतकरी आत्महत्यां शुन्यावर आणल्या आहेत. आज तेलंगानात आर्थिक ताणातुन शेतकरी आत्महत्या करत नाहीत. आज राज्यात दिवसाला दहा शेतकरी आर्थिक ताणामुळे आपले जीवन संपवत आहेत . राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवायच्या असतील तर तेलंगाना मॉडेल राज्यात राबविण्यासाठी राज्यात किसान सरकार स्थापन करण्यासाठी शेतकरी संघटनेने भारत राष्ट्र समितीला पाठिंबा देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला.
शेतकरी संघटनेच्या वतीने भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगानाचे मुख्यमंत्री श्री केसीआर यांनी तेलंगानात शेतकऱ्यांच्या आत्महत्यां थांबवण्यासाठी केलेल्या उपाययोजना व नुकतीच शेतकऱ्यांचे एकोणवीस हजार कोटी रुपयांचे कर्ज रद्द करुन त्यांना कर्ज मुक्त केले. या बद्दल त्यांचा महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने के चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा दि ९ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्यभरातुन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
तेलंगानात सध्या सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशामुळे श्री केसीआर या सोहळ्याला उपस्थित राहु शकले नाही त्यांच्या ऐवजी महाराष्ट्र प्रभारी श्री के वामशीधर राव यांनी केसीआर यांचा सन्मान स्विकारला व हा सन्मान मुख्यमंत्री श्री केसीआर यांच्या पर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले.
या सोहळ्याला के वामशीधर राव, रघुनाथदादा पाटील,शंकरआण्णा धोंडगे,भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम,पुणे विभाग समन्वयक बी जे देशमुख शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, ॲड अजित काळे, मा.खा. हरीभाऊ राठोड, शिवाजी नांदखिले,सुधीर बिंदु,बिजी काका पाटील,शर्वरी पवार यांच्या सह भारत राष्ट्र समिती चे सर्व समन्वयक , शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रास्ताविक बि जी काका पाटील यांनी केले तर यावेळी मा.आ.शंकर आण्णा धोंडगे , शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड अजित काळे शिवाजी नांदखिले,कार्याध्यक्ष कालीदास आपेट श्री के वामशीधर राव यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यकर्माचा समारोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शर्वरी पवार यांनी केले . यावेळी मोठ्या संख्येने शेतऱ्यांनी भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला.