कॉलेजच्या आवारात फिरणारे टवाळखोर ६८ मुलांवर कार्यवाही. १५ वाहनांवर कार्यवाही करुन एकुण ११,५००/- रुपये दंड वसुल दामिनी पथकाची कारवाई.
संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा . दि. ०४/०८/२०२३
मा.पोलीस अधिक्षक सो. अहमदनगर, मा. अपर पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या आदेशाने व
मार्गदर्शनाखाली भरोसा / निर्भया सेलच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी
उबरहंडे / देशमुख यांनी भरोसा / निर्भया पथकाच्या एकुण तीन टिम तयार केल्या. प्रत्येक
टिमममध्ये तीन महिला अंमलदार व एक पुरुष अंमलदार हे साध्या वेशात कॉलेज आवारामध्ये
वावरत असतांना त्यामध्ये न्यु आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, रेसिडेन्सीअल हायस्कुल,
सिध्दी बाग अहमदनगर येथील विना परवाना वाहन चालविणारे, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर प्लेट
तसेच शाळेमध्ये अॅडमिशन नसतांनाही शाळेच्या / कॉलेजच्या आवारात फिरणारे टवाळखोर
मुलांवर अशा एकुण ६८ मुलांवर कार्यवाही करण्यात आल्या. या व्यतिरिक्त एकुण १५ वाहनांवर
कार्यवाही करुन एकुण ११,५००/- रुपये दंड वसुल केला.
तसेच शाळा / कॉलेज, बस स्टॅण्ड येथे विदयार्थीनींशी चर्चा केली. त्यांच्या
अडचणी जाणुन घेतल्या. त्यांना काही अडचण असल्यास निर्भया पथकाचे मोबाईल नं.
९३७०९०३१४३ व डायल ११२ वा कॉल करणे बाबत माहिती दिली. या व्यतिरिक्त शाळेतील
शिक्षकांशी चर्चा करुन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, विदयार्थ्यांना शाळेचे आय कार्ड कंम्पलसरी करणे
बाबत सुचना दिल्या. तसेच कोणी टवाळखोर मुले संशयितरित्या आढळुन आल्यास त्याबाबत
तात्काळ माहिती निर्भया पथकातील अंमलदारांना कळविण्याबाबत सुचना दिल्या.
सदर पथकामध्ये निर्भया पथकाच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक
पल्लवी उबरहंडे / देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली खालील अंमलदारांचा सहभाग होता.
सहा. फौज.एस.के.
शेख, पो.हे.कॉ. बी. बी. पोकळे, पो.कॉ.के.लेंडाळ, चा.पो.ना.एस. व्ही. कोळेकर,
म.पो.हे.कॉ.एस.टी.डिघुळे, म.पो.ना. एस.
बी. औटी, म.पो.ना. ए. के. विधाटे, म.पो.ना.एस.एस. ढवळे,
म.पो.कॉ. आर. आर. ठोंबे, म.पो.कॉ. एम. बी. पुरी, म.पो.कॉ. एस. व्ही. रोहोकले यांनी कारवाई केली.