संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक -03/08/2023
सविस्तर माहितीसाठी- नेवासा तालुक्यातील अनेक ठिकाणी डोळे येण्याच्या रूग्णांची संख्या वाढली आहे.या व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. धूर किंवा धुळीसारख्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो.अनेक ठिकाणी डोळ्यांची अॅलर्जी या कारकांमुळे हा आजार वाढत आहे.डोळे
आलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने पसरत आहे. पावसाळ्यात
नागरिकांनी काळजी घ्यावी
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार
घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
एकमेकांच्या संपकातून ही
साथ झपाट्याने पसरत आहे.
त्यामुळे चष्मा वापरा, हाताची
स्वच्छता ठेवा, डोळ्याला हात लावू
नका, डोळे आल्यावर इतरांपासून
दूर राहा, असे आवाहन आरोग्य
विभागाने केले आहे.
संसर्गजन्य या आजारामुळे रुग्णांची
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .आजारांवरील उपाय-
चष्मे व हातरूमाल
दुसऱ्यांना वापरायला देऊ
नका; डोळे चोळू नका
उन्हापासून, व
धुळीपासून डोळ्याचे रक्षण
व्हावे म्हणून चष्मा वापरावा
डोळे आलेल्यांनी
डॉक्टरांच्या सल्ल्याने
सुचवलेले आय ड्रॉप्स
वापरावेत.
*आजाराची लक्षणे*…डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?
डोळे आले असल्यास काही लक्षणं प्रामुख्याने जाणवू लागतात.
डोळे हलके लाल होऊ लागतात.
डोळ्यातून पाणी यायला लागतं.
खाज येऊ लागते.
डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.
डोळ्यात वारंवार खाज येते.
लेष्मल निघणारे, लाल आणि सुजलेले डोळे,
पाणावलेले डोळे होतात.
बोचरी संवेदना, खाज येणे, जळजळ होणे, दाह;
हा आजार पसरतो. लहान मुलांसह
प्रौढांमध्ये याचा संसर्ग सर्वाधिक
आहे. डोळ्यात
चिकटपणा जाणवतो
पापण्या किंवा पापण्यावरच्या केसांवर
रखरखीत थर जमा होतात
डोळ्यांना सूज येते, डोळे लालसर होतात,
डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर पडतो
संसर्गजन्य
आजार असल्याने एकाच्या संपकातून दुसऱ्यांनाही तो आजार होऊ शकतो. त्यामुळे ज्या मुलांचे डोळे
आले आहेत,
त्यामुळे गर्दीच्या वेळी घराबाहेर
पडू नये, असे आवाहन आरोग्य
विभागाकडून करण्यात आले आहे.