गुन्हेगारी
Trending

नेवासा तालुक्यात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे सह आरोपी जेरबंद.

संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा दिनांक -24/05/2023

सविस्तर माहिती -नेवासा तालुक्यात
दिनांक 22.05.2023 रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना गुप्त बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली की,
माळीचिंचोरा फाटा ता. नेवासा जि. अहमदनगर येथे ईसम नामे आकाश संजय पवार हा बेकायदेशीर गावठी कट्टा व काडतुसे जवळ
बाळगुन फिरत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचे आदेशाने पोलीस स्टेशन
नेवासा येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस कॉन्सटेबल सुमित करंजकर, पोलीस कॉन्सटेबल
शाम गुंजाळ, पोलीस कॉन्सटेबल गणेश ईथापे व दोन पंच असे सर्वजण नेवासा पोस्टे येथुन खाजगी वाहनाने रवाना होवुन
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार माळीचिंचोरा फाटा ता. नेवासा जि. अहमदनगर येथे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावुन थांबले
असता, एक ईसम संशयीत रित्या माळीचिंचोरा फाटा ता. नेवासा येथे फिरत असताना दिसल्याने ठिक 19.00 वाजण्याच्या सुमारास
सदर ईसमाजवळ जावुन त्याला आम्ही सर्वांनी घेराव घालुन पोलीसांनी त्याला हटकले असता, त्याला पोलीस आल्याचा संशय
आल्याने त्याने त्याच्याजवळ असलेला उजव्या कमरेला लावलेला गावठी कट्टा दाखवुन तो पोलीसांना भिती दाखवु लागला, त्याच
दरम्याण फिर्यादी व पोकॉ/ गणेश ईथापे असे दोघांनी त्याच्या अंगावर झडप घालुन त्याला पकडुन ताब्यात घेतले त्यादरम्याण त्याला
त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव आकाश संजय पवार, वय 23 वर्षे, रा. ब्रम्हतळे / ब्रम्हनगर नागरदेवळे भिंगार
ता. जि. अहमदनगर असे सांगितले त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या अंगझडती मध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये
असलेला गावटी कट्टा ( पिस्टल ) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे, एक मोबाईल व त्याची वापरती एक
मोटारसायकल असा मुद्देमाल मिळुन आलेला आहे.
त्यानंतर सदर ईसमास ताब्यांत घेवून पोलीस स्टेशन नेवासा येथे आणुन त्याच्याविरुध्द श्री. शाम बाबासाहेब गुंजाळ
नेमणुक पोलीस स्टेशन नेवासा यांनी सदर ईसमाविरुध्द फिर्याद दिल्याने त्यावरुन पोलीस ठाणे नेवासा येथे गु.र.नं 556/2023
भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 ( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल
हे करीत असुन ताब्यात घेतलेला ईसम नामे आकाश संजय पवार रा. भिंगार ता. जि. अहमदनगर यांस सदर गुन्ह्यांत अटक केलेली आहे.

सदरची कारवाई ही ा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो अहमदनगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर
श्रीरामपुर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके सो उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शिवाजी डोईफोडे
पोलीस निरीक्षक, श्री.समाधान भाटेवाल, पोलीस उप निरीक्षक, मपोना/ सविता उंदरे, पोकॉ/ सुमित करंजकर, पोकॉ/ शाम गुंजाळ,
पोकॉ/गणेश ईथापे यांनी केली असुन पुढील तपास श्री. समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे नेवासा हे करीत
आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे