नेवासा परिसरात दरोड्याचे तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी १,०५,०००/- रुपये मुद्देमालासह जेरबंद.
संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा ,दिनांक -22/05/2023
साईनाथ नगर, ता. नेवासा परिसरात दरोड्याचे तयारीत असलेली राहाता येथील सराईत
आरोपींची टोळी १,०५,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल, मोबाईल फोन, लोखंडी
सुरा, लाकडी दाडंके व मिरचीपुड अशा साधनासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर
यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे
आरोपींची माहिती घेवून त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,
पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना / रविंद्र कर्डीले, फुरकान शेख,
प्रशांत राठोड, पोकॉ/मधुकर मिसाळ, आकाश काळे, अमृत आढाव व चापोहेकॉ/ संभाजी कोतकर अशा
पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचना प्रमाणे पथक नेवासा, सोनई परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत
असताना पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती
मिळाली की, ५ ते ६ इसम मोटार सायकलवर दरोडा घालण्याचे तयारीत नेवासा ते श्रीरामपूर रोडने
नेवासा परिसरात येत आहेत. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी
जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक नेवासा ते श्रीरामपूर रोडवर, साईनाथ नगर
शिवारात सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे दोन मोटार सायकलवर काही इसम
जोरात येताना दिसले. पुढे असलेल्या मोटार सायकल चालकाला हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच
त्याने मोटार सायकलचे दोन्ही ब्रेक जोरात दाबल्याने ते खाली पडला. पथकाने पळुत जावुन पडलेल्या
इसमांना ताब्यात घेतले. त्याचवेळी मागील मोटार सायकलवर तीन इसम बसलेले दिसले त्यांनी पथकास
पाहुन मोटार सायकल वळवुन श्रीरामपूरच्या दिशेने पळुन गेले त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले
नाहीत. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी
त्यांची नावे १) शुभम अनिल काळे, वय २३, रा. गणेश नगर, ता. राहाता हल्ली रा. खंडेवाडी, ता.
बिडकीन, जिल्हा औरंगाबाद व २) दिपक अरुण चव्हाण, वय २४, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा असे
असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या
इसमाचे नाव ३) अक्षय यशवंत आव्हाड (फरार), ४) आनंद ऊर्फ टकल्या अनिल काळे (फरार), ५) शाहिद
अकबर शेख ( फरार ), सर्व रा. गणेशनगर, ता. राहाता असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचा
समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक हिरो कंपनीची मोटार सायकल, तीन मोबाईल फोन, एक
लोखंडी सुरा, एक लाकडी दाडंके व मिरचीपुड असा एकुण १,०५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन
आला असुन नमुद आरोपी विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४३ / २०२३ भादविक ३९९, ४०२ सह
आर्म अॅक्ट ४ / २५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास नेवासा
पोलीस स्टेशन करीत आहे.