बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय परस्पर पसार करणारा आरोपी पारनेर पोलीसांकडून जेरबंद. 2,38,090/- रूपयाचा मुददेमाल पोलीसांकडून जप्त.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा
दिनांक- 10/05/2023
बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय परस्पर पसार करणारा आरोपीत पारनेर पोलीसांकडून
जेरबंद. अटक आरोपीत कडून 2,38,090/- रूपयाचा मुददेमाल पोलीसांकडून जप्त.
यातील फिर्यादी नामे वैभव प्रदिप औटी वय २२ वर्षे धंदा चालक रा. कोर्ट गल्ली, पारनेर ता. पारनेर हे
चालक म्हणून काम करतात. फिर्यादी माल वाहतूक करीत असतात. दिनांक ०३/०५/२०२३ रोजी त्यांना श्री. दिपक
औटी रा. पारनेर यांनी बोलावून सांगीतले की, महावीर सूपर मार्केट टाकळी ढोकेश्वर येथील शितपेयाची ऑर्डर आहे,
ते मागणी प्रमाणे लोड करून टाकळी येथे डिलीव्हरी करून या. त्यावेळी त्यांनी वेगवेगळया कंपनीचे १,३२,४००/-
रूपयाचे शितपेय लोड केले. व टाकळी ढोकेश्वर येथे पाठवून दिला. यातील आरोपीत यांनी शासकिय रूग्णालय
टाकळी ढोकेश्वर येथे आधीच पिकअप वाहन आणून सुदर्शन किराणा स्टोअर्स समोर येवून थांबले होते. आरोपीत यांनी
फिर्यादींचा टेम्पो अडवून महावीर सूपर शॉप चे मालकाने अर्धा माल पिकअप मध्ये खाली करण्यास सांगीतला आहे. व
उर्वरित सूपर शॉप मध्ये जावून खाली करा व पैसे महावीर शॉप मधून घेवून टाका असे सांगीतले. फिर्यादी यांनी
विश्वास ठेवून त्यांना माल टेम्पो मधून काढून दिला. महावीर सूपर शॉप येथे जावनू अर्धा माल कूठे खाली करू असे
विचारलेवर तेथील श्री. चेतन भंडारी यांनी मालाची मागणी केली नसल्याचे सांगीतल्यावर फिर्यादी यांना फसवणूक
झाल्याचे निदर्शनास आले. वैभव औटी यांनी घडलेली सर्व हकीकत त्यांचे मालक श्री. दिपक औटी यांना दिली. श्री.
दिपक औटी यांना मागणी झालेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तो स्विच ऑफ आला.
त्यांनतर फिर्यादी यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दिल्याने गुरक. ४१३/२०२३ भादवी
कलम ४२०,४०६,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, मा. उपविभागीय पोलीस
अधीकारी श्री. अजित पाटील सो. मा. पोलीस निरीक्षक सो. पारनेर पोलीस स्टशेन यांचे सूचनेनुसार तपास सूरू
करण्यात आला. त्यामध्ये घटनास्थळाचे आजूबाजूचे सिसिटिव्ही कॅमेरे चेक करण्यात आले, कॉल डिटेल्स घेण्यात आले
व आरोपीत याचे टोल नाका येथे सिसिटिव्ही चेक केले परंतू टेम्पो आरोपीत यांनी टोल नाक्यावर न नेता आड मार्गने
नेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर गोपनीय साक्षीदार व तांत्रिक तपास वरून आरोपीत शेवगाव
तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे नाव दिपक गणेश गुगळे असून वडूले गावाचा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यास मिरी माका गावाच्या शिवारात अंधारात पाठलाग करून ताब्यात घेतले. सूरूवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे
दिली परंतू नंतर त्याने गुन्हयात वापरलेली पिकअप, गाडी व फसवणूक करून नेलेली शितपेय असे एकुण
२,३८,०९०/- रूपयेचा मुददेमाल काढून दिला, व उर्वरित मुददेमाल त्यांचे साथीदार १) ऋषीकेश वंजारी गधेवाडी ता.
शेवगाव, ३) ओमकार गुंजाळ पूर्ण नाव पत्ता माहित नाही. ४) जयेश संदिप खरमाळे रा. भांडगाव, ता. पारनेर यांनी
विकल्याचे गुन्हयात कबुली दिली. तसेच पांढरी पूलावर सुमारे एक लाख रूपये किमतीचे लिवागार्ड बॅटरी व इन्व्हर्टर
अशाच प्रकारे फसवणूक करून पळवून नेल्याचे तपासात कबुली दिली. सदर बाबत सोनई पोलीस स्टेशन येथे गुरन.
२०६/२०२३ भादवी कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपीत याचे काईम रेकॉर्ड चेक केले असता त्याच्यावर आता पावेतो १) जामखेड पोलीस स्टेशन
गुरनं. २१४/२०१८ भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम ३, २५, वगैरे, २) कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं,
१९७०/२०२० भादवी कलम ४२०, वगैरे, ३) सोनई पोलीस स्टेशन गुरनं. ५५९/२०२० भादवी कलम ४२०, ४०६
वगैरे, ४) जामखेड पोलीस स्टेशन गुरनं. १६८/२०२१ भादवी कलम ४५७, ३८०
वगैरे, ५) शेवगाव पोलीस स्टेशन
गुरनं. ३४५/२०२१ भादवी
असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
सदरची उल्लेखनीय
श्री. राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.
प्रशांत खैरे सो, उपविभागीय
मार्गदर्शना खाली पोलीस
गुन्हयाची नोंद
कलम ४२०, वगैरे, व इतर
कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक
अधिकारी नगर ग्रामिण विभाग श्री. अजीत पाटील
सो, यांचे
निरिक्षक श्री. संभाजी गायकवाड यांचे सूचने नूसार सहायक पोलीस निरिक्षक विजय ठाकुर, पोहेकॉ. संदिप गायकवाड,
पोशि. मच्छींद्र खेमनर, पोशि. रविंद्र साठे यांच्या पथकाने केली.