संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा, दिनांक-09/05/2023
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कारखाना गेट समोर झालेल्या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नेवासा शेवगाव रस्त्यावरील भेंडा येथील कारखाना मेन गेट समोर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जाते.
या अपघातातील स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH- 12 HC 4200 व MH- 17 CR 4291 या दोन कार येऊन एकमेकांना धड़कल्या या
दोन कारच्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला. सुरेश यादव आढागळे रा.नागापुर ता नेवासा यांचा जागीच मृत्यू झाला असून दूसरे मनोज रामभाऊ अस्वले रा. भेंडा हे गंभीर जखमी झाले आहे. सदर मृत व्यक्तीचा मृतदेह नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून
सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.