संपादकीय

नेवासा- शेवगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा गडाख घुलेंच्या हस्ते सन्मान

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा ) दिनांक-10/01/2023


सविस्तर माहिती- नेवासा शेवगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेतून सरपंच पदी निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान माजी मंत्री आमदार शंकररावजी गडाख आणि शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले यांच्या शुभहस्ते माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली भेंडा येथे नुकताच संपन्न झाला.
नेवासा शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सन्मान गणेश गव्हाणे पाटील मित्रमंडळ नेवासा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष संगीता गव्हाणे यांच्या वतीने भेंडा येथे करण्यात यावेळी बोलताना शेवगाव चे मा सभापती डॉ क्षितिजभय्या घुले पाटील म्हणाले की पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाची कणा आहे निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याने सर्वांना बरोबर घेऊन काम केले तर निश्चितच आपल्या गावाचा परिसराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही आम्ही कायमस्वरूपी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गणेश गव्हाणे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले यावेळी
नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काशिनाथ नवले तुकाराम मिसाळ मुळाचे संचालक एकनाथ धाना पुणे ज्ञानेश्वर चे संचालक शिवाजी कोलते बाळासाहेब नवले वैभव नवले सोपान महापूर दिलीप धानापुणेनामदेव निकम नामदेव शिंदे पंजाब शिंदे कल्याण उभेदळ विजय धनवडे रवींद्र गव्हाणे संजय गव्हाणे राजेंद्र आढाव मेहबूब शेख आधी उपस्थित होते

यावेळी भेंडा खु च्या सरपंच वर्षाताई नवले सुरेश नगरच्या सरपंच शैलाताई उभेदळ चिचबनच्या सरपंच मीनाताई काकडे भायगावच्या सरपंच मनीषा आढाव रांजणीचे सरपंच काकासाहेब घुले दहेगावचे सरपंच सूर्यकांत पाऊलबुद्धे हंडी निमगाव च्या सरपंच पुजाताई आघाव वडाळ्याचे सरपंच ललित मो जोहरापूर चे सरपंच रोहन लांडे माळीचिंचोराचे सरपंच संतोष अहिरे आदींचा उपसरपंच सदस्या सह सन्मान करण्यात आला
याप्रसंगी भेंडा बु च्या सरपंच उषा मिसाळ दिनकर गर्जे अशोक मिसाळ आदींची भाषणे झाली अध्यक्षीय भाषणात पांडुरंग अभंग यांची पंचायत राज व्यवस्था विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या, आभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संगिता गव्हाणे यांनी मानले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे