पो कॉ अशोक भोसले यांचे बंधू श्री शरद भोसले सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*
संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक- 08/ 09/2022
पो कॉ अशोक भोसले यांचे बंधू श्री शरद भोसले सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार* सविस्तर माहिती-
तेलकुडगांव,७: शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाबद्दल येथील भोसले क्लासेस चे संचालक शरद भोसले सर यांचा येथील ग्रामस्थ व राजमाता जिजाऊ बहूउद्देशिय ग्रामविकास प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने नागरी सन्मान करण्यात आला .
आर्थिक दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत येथील ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या घवघवीत यशाबद्दल आज हा (ता.६) सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या एक गाव एक गणपतीच्या महाआरतीदरम्यान हा सन्मान करण्यात आला दरम्यान क्लासेस च्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक काळे ,विकास काळे ,अशोक काळे, शैलेश गुंफेकर ,सुरेश काळे (भाऊजी), मच्छिंद्र म्हस्के तसेच शरद भोसले सर यांचे बंधू पो. कॉन्स्टेबल अशोक भोसले आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.