गुन्हेगारी
Trending

नगर तालुक्यात घरफोडी करणारा सराईत आरोपी सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ४,८७,५०० / – रु . किं.चे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा) दिनांक : -०५ / ० ९ / २०२२


नगर तालुक्यात घरफोडी करणारा सराईत आरोपी सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ४,८७,५०० / – रु . किं.चे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


. प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि . दिनांक २४/०८/२०२२ रोजी फिर्यादी श्री . शामराव इंद्राजी आंधळे वय ६० , रा . कामरगांव , ता . नगर हे कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेलेले असतांना अनोळखी चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडुन कडीकोंडा उघडुन आत प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने व रोख असा एकुण १,३०,००० / – रु.किंमतीचा ऐवज घरफोडो चोरी करुन चोरुन नेला होता . सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुरनं . ५८ ९ / २०२२ भादवि कलम ४५४.३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने मा . पोलीस अधिक्षक सो , अहमदनगर यांनी पोनि श्री . अनिल कटके . स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गुन्ह्याचे समातंर तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या . नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / दिनकर मुंडे , पोहेकॉ / सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , बापुसाहेब फोलाणे , संदीप पवार , संदीप घोडके , पोना / रवि सोनटक्के , भिमराज खसे , पोकॉ / विनोद मासाळकर , योगेश सातपुते व चापोहेकाँ संभाजी कोतकर असे अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि , वरील नमुद गुन्हा हा आष्टी , जिल्हा बीड येथील सराईत गुन्हेगार प्रविण ऊर्फ भाजी हवाजी भोसले रा पिंपरखेड , आष्टी , जिल्हा बीड व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून प्रविण भोसले व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करणेसाठी मोटार सायकलवर जामखेड ते नगर रोडने अहमदनगर कडे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंच व पंचनामा करण्याचे साहित्यासह शासकिय वाहनाने चिचोंडी पाटील नगर जामखेड रोडने जात असतांना चिचोंडी पाटील गांवातील एसटी स्टॅण्डवर दोन संशयीत इसम मोटार सायकल बाजुला लावुन थांबलेले दिसले . पथक छापा घालुन संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच आरोपी पळुन जावु लागले . पथकाने संशयीतांचा पळत जावुन पाठलाग करुन एका इसमास शिताफीने ताब्यात घेतले व एक इसम मोटार सायकल सोडुन पळुन गेला . त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही . ताब्यात घेतलेल्या इसमा त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) प्रविण ऊर्फ भाजी हबाजी भोसले वय पिंपरखेड , ता . आष्टी , जिल्हा वीड असे असल्याचे सांगितले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली . त्या बाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन व बारकाईने चौकशी करता त्याने नगर तालुका हद्दीतील चिचोंडी पाटील , मठपिंप्री व कामरगांव परिसरात दिवसा घरफोडी करुन चोरी केले बाबत कबुली दिली . पळुन गेलेल्या साथीदारा बाबत विचारपुस करता त्याने त्याचे नाव २ ) मुकेश उग्रिसेन ऊर्फ उग्रॉ भोसले , रा . साबलखेड , ता . आष्टी , जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले पळुन गेलेल्या इसमांचा शोध घेत आहोत . आरोपी नगर तालुका हद्दीत गुन्हे केले बाबत कबुली दिल्याने अभिलेख पडताळणी केली असता नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले खालील प्रमाणे दिवसा घरफोडीचे ०४ गुन्हे उघडकिस आलेले आहेत. सदरची कामगिरी मा मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, अजित पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे