गुन्हेगारी
Trending

अहमदनगर जिल्ह्यातील ६०३ ठिकाणी अवैध दारु व गावठी हातभट्टी मधील ६०३ आरोपी विरुध्द कारवाई करुन ४ ९ , ३६ , ९९ ८ / – रु . कि . चा मुद्देमाल जप्त.

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक : -१० / ० ९ / २०२


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सविस्तर माहिती- दिनांक १५ ऑगस्ट , २०२२ ते दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारु विरुद्ध विशेष मोहिमेचे आयोजन कारवाई करणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपले पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु , गावठी हातभट्टयांचा शोध घेवुन ५४२ ठिकाणांवर छापे घातले व ५४२ आरोपींना ताब्यात घेवून २७,०८ , ९९ ३ / – ( सत्तावीस लाख आठ हजार नऊशे तेरा रुपये ) रु . किं . चा मुद्देमाल जप्त करुन नाश केला . तसेच पोनि / श्री . अनिल कटके यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून ६१ ठिकाणंवर छापले घातले व ६१ आरोपींना ताब्यात घेवून २२,२७ , २८५ / – ( बावीसलाख सत्तावीस हजार दोनशे पंच्याशी रुपये ) रु.कि.चा जप्त व नाश केलेला मुद्देमाल असे एचा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आलेला आहे . वरील प्रमाणे कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अगरवाल साहेब , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर व श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उविपोअ यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे