मुस्लिम धर्मगुरूंची गोळ्या घालून हत्या करणारे तीन आरोपी दोन गावठी कट्टे व काडतुसासह जेरबंद

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक-04/08/2022
मुस्लिम धर्मगुरूंची गोळ्या घालून हत्या करणारे तीन आरोपी दोन गावठी कट्टे व काडतुसासह जेरबंद
सविस्तर माहिती-अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात आलेले मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुस्लिम धर्मगुरूची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणानंतर नाशिक पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला जात होता. तरीही आरोपी हे फरारच होते. पण अखेर अहमदनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संबंधित आरोपींना जेरबंद केले आहे.
आरोपींकडून शस्त्रसाठाही जप्त
अहमदनगर पोलिसांनी या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. संतोष ब्राह्मने, गोपाळ बुरगुले, विशाल पिंगळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.रात्री १० वाजण्याच्या सुमारास हॉटेल सर्जा वर जेवण करत असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी झडप मारली . त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतुसे देखील आढळून आली . सदरची कामगिरी मा मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे , पोलीस उपनिरीक्षक सज्जन नान्हेडा , अजिनाथ पाखरे , नितीन शिरसाठ लिपाने , कुटे , कांबळे , आर्दीच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नान्हेडा हे करत आहेत .