ब्रेकिंग
Trending

राहुरी येथील गोदामावर छापा ड्रग्ज सदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे 1कोटी 25 लाख रुपयांचा अवैध साठा जप्त.

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 04/08/2022


राहुरी येथील गोदामावर छापा ड्रग्ज सदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे 1कोटी 25 लाख रुपयांचा अवैध साठा जप्त.


राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडलगत असलेल्या गोदामात ड्रग्ज सदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे 1कोटी 25 लाख रुपये किंमतीचा मोठा बेकायदा साठा आढळून आला . या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे . पोलीस पथकाने बुधवारी ( दि .03 ) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली आहे . दरम्यान , घटनास्थळी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने येऊन संबंधित औषधांची तपासणी केली . सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते . ही अंमली पदार्थांची तस्करी कोठे कोठे सुरू होती . या तस्करीत कोण कोण सामील आहेत. याचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे . उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले होते . तर मुद्देमालाची पॅकिंग करून ताब्यात घेण्याचे काम सुरू होते . काल सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपूर , यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी राहुरी येथील चार ते पाचजणांची पोलीस पथकाने धरपकड केली . त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली . त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके , राहुरी येथील पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप दराडे , अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले , पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा , महिला पोलीस उप निरीक्षक ज्योती डोके , आदींसह डीवायएसपी पथकातील फौजफाट्याने दुपारी तीन वाजे दरम्यान राहुरी शहर हद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिवचिदंबर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली . त्याठिकाणी उत्तेजित करणाऱ्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या , नशेच्या गोळ्या आढळून आल्या.अन्न व औषधे विभागाचे ज्ञानेश्वर दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम ३२८,४२० , २७६ , ३४ सह गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ ( NDPS act ) अधिनियम १ ९ ८५ कलम २१ , २१ ( ब ) , २२ , २२ ( अ ) ( ब ) सह औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १ ९ ४० व नियम १ ९ ४५ कलम १८ ( A ) , १८ ( C ) , २२ ( CCa ) , शिक्षा कलम २७ ( b ) , ( ii ) , २८ प्रमाणे गुरनं . ७२३ / २०२२ दाखल करण्यात आला . औषध प्रशासन विभाग अहमदनगर यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी १ ) जमील महेबुब शेख , वय ३२ वर्ष , रा.जुना कनगर रोड , राहुरी , २ ) अक्तर चाँद शेख , वय २१ वर्ष , रा . मल्हवारवाडी राहुरी यांच्याविरुद्ध राहूरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई मधे एकूण ३३,०७ , ९ ४६ / रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.सदरची कारवाई.मा.मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर,अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम श्रीरामपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप मिटके उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, प्रताप दराडे पोलिस निरीक्षक राहुरी, पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा, महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, आदींसह पोलिस कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे